मनातलं पानावर हे पुस्तक आनंद देणारे ठरेल –डॉ. संजय कळमकर

संगमनेर (प्रतिनिधी)-
-जगातील सर्वात दुःख मलाच आहे असे अनेक जण समजून जीवन दुखी करतात. दुःख विसरा हसत रहा. शोधले तर प्रत्येक ठिकाणी आनंद आहे. व्यंग हे प्रत्येक ठिकाणी आहे. ते शोधण्याची कला अरविंद गाडेकर यांना असून त्यांच्या मनातलं पानावर हे पुस्तक सर्वांना आनंद देणारे ठरेल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केला आहे.
सह्याद्री महाविद्यालयाच्या के.बी दादा सभागृह येथे मनातलं पानावर या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झालं यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ.डॉ. सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर सौ. दुर्गाताई तांबे, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, अरविंद गाडेकर, सौ सविता गाडेकर, अनिल देशपांडे, ज्येष्ठ संपादक किसन भाऊ हासे, हिरालाल पगडाल, अमोल गवांदे, डॉ. संजय गोरडे, डॉ जी.पी. शेख, डॉ संतोष खेडलेकर, आधार फाउंडेशन चे सुखदेव इल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ संजय कळमकर म्हणाले की, संगमनेरला साहित्य संस्कृतीची आणि जाणकार राजकीय नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला सर्व क्षेत्रात समृद्ध व अग्रेसर बनवले. साहित्य हे जीवनात आनंद निर्माण करते. प्रत्येकाला जशी दृष्टी त्यातून तशी सृष्टी दिसते. प्रत्येक क्षेत्रात व्यंग आहे ते शोधता आले पाहिजे आणि त्यातून आनंद निर्माण करता आलं पाहिजे. मात्र अनेक जण स्वतःच्या दुःखात चिंतेत असतात. जगाच्या तुलनेत तुमचे दुःख अत्यंत शूद्र आहे हे समजून तुम्ही आनंदी राहा. चिंतन मनन मधून विचारांची मोती बाहेर पडत असतात. कोरोना संकटात आपल्याला जवळची माणसे कळाली मात्र तरीही आपण सुधारलो नाही. प्री-वेडिंग नावाचा प्रकार हा अत्यंत धोकादायक असून तो बंदही झाला पाहिजे असे सांगताना अनेक विनोदी किस्स्यांनी त्यांनी सर्वांना खळखळून हसवले.

तर मा आ डॉ तांबे म्हणाले की, व्यंगचित्र ही अवघड कला असून अरविंद गाडेकर यांनी त्यातून आपले मोठे नाव केले आहे. सततचे परिश्रम सातत्य आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे . त्यांचा जीवन प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या ललित कथांचे मनातलं पानावर हे पुस्तक लोकप्रिय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की आर के लक्ष्मण यांनी व्यंगचित्रांमधून या क्षेत्राला नवी ओळख निर्माण करून दिली अरविंद गाडेकर यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून संगमनेरचे नाव राज्यात नेले.
तर श्रीमती सुवर्णाताई मालपाणी म्हणाल्या की अरविंद गाडेकर यांचे साहित्य हे मनाला आनंद देणारे आणि हसवणारे आहे.
यावेळी साहित्य परिषदेचे दिलीप उदमले, मंगला पाराशर , ज्ञानेश्वर राक्षे ,निलेश पर्बत ,सुप्रिया गवांदे, अनुराधा आहेर , पुष्पाताई निराळी, अनघा खेडकर, मनोज साकी, सुरेश परदेशी ,मुकुंद डांगे , प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, प्रा.शशांक गंधे, गिरीश सोमाणी , बाळकृष्ण महाजन, महेश गोडसे, विजय दीक्षित, शेख इदरीस, रामनाथ सातपुते ,अनुश्री खैरे, मंगल पेटकर, डॉ. किरण चांडक, स्मिता सुतार, लीना क्षत्रिय , अलोक बर्डे, सागर पन्हाळे , स्वप्नील कोल्हे आदी सह संगमनेरच्या साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक तथा आकाशवाणीचे अभिवाचक अनिल सोमणी यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व यश गाडेकर यांनी केले तर ज्ञानेश्वर राक्षे यांनी आभार मानले.
यावेळी संगमनेर शहरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरविंद गाडेकर यांचे लिखाण तणावमुक्त करणारे — माजी मंत्री बाळासाहेब थोरातव्यंगचित्रांमधून भावना व्यक्त करण्याबरोबर मार्मिक टीका करणारे अरविंद गाडेकर यांचे लिखाण हे हलकेफुलके असून आनंद निर्माण करणारे आहेत. सोशल मीडियाच्या जमानतही वाचकांचा मोठा वर्ग असून नागरिकांच्या धावपळीच्या जीवनात त्यांना तणाव मुक्त करणारे व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे लिखाण असल्याचे कौतुक महाराष्ट्राचे माजी महसूल तथा कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा देऊन केले आहेत.



