इतर

प्राथमिक शाळा, वाकी येथे दुसरी शिक्षण परिषद संपन्न

एस. के. जाधव
कोकणवाडी (ता. अकोले ) प्रतिनिधी


अकोले तालुक्यातील केंद्र मान्हेरे येथील जि.प. प्राथमिक शाळा, वाकी येथे दुसरी शिक्षण परिषद संपन्न झाली.
परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक बंधु – भगिनिंचे स्वागत श्री. अर्जुन तळपाडे सर यांनी केले. मंचावर विराजमान झालेले मुख्याध्यापक श्री बांडे सर आणि श्री ढगे सर यांच्या परवानगीने शिक्षण परिषदेला सुरुवात करण्यात आली.
या शिक्षण परिषदेकरिता सुलभक म्हणून श्री पांडूरंग काळू खाडे सर, श्री रमाकांत तुकाराम भागडे सर, श्री युवराज तळपे सर यांनी काम पाहिले.


श्री पांडूरंग खाडे सर यांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केल्यानंतर म्हणाले, ” आज आपल्याला काहीतरी नवीन शिकायचे आहे. डॉ. जयंती नारळीकर समृद्धी कार्यक्रम ऑनलाईन शिकायचा आहे. ” यामध्ये विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन, एम. आर. खान अकॅडमी लॉगइन करणे, विषय निवडणे, शाळा आणि विद्यार्थी सदर अकॅडमीला जोडणे, युजर नेम आणि पासवर्ड बनवणे हे सर्व मोबाईल वरती प्रत्यक्ष करून दाखवले.
श्री रमाकांत भागडे सरांनी विज्ञान विषय आणि अध्ययन अध्यापन पद्धतीचा सखोल अभ्यास, नवीन पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, साहित्य यांचा वापर विद्यार्थी आणि पालकांनी कसा करावा याचे मार्गदर्शन तसेच शाळा आणि समस्यांचे निरसन केले.
यावेळी मान्हेरे केंद्रात नवीन रुजू झालेले शिक्षक श्री गणपत उघडे, श्री सोमनाथ धिंदळे, श्री राघु भांगरे, श्री रघुनाथ वायळ, श्री अर्जुन भांगरे, श्री सुधाकर भांगरे, श्री पंढरीनाथ पोटकुले, श्री सुरेश पवार,श्री सुर्यकांत देशमुख, श्री पुनाजी मुंढे यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
शेवटी श्री युवराज तळपे सरांनी मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button