इतर
कु.गवांदे समीक्षा हिची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

अकोले प्रतिनिधी
कु.गवांदे समीक्षा हिची लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला असून तिची पुणे विभागीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे ,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर, प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर आयोजित जिल्हास्तरीय शालेय (19 वर्षे वयोगट) ॲथलेटिक्स स्पर्धेत कुमारी गवांदे समीक्षा हिने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला
पुणे विभागीय शालेय मैदानी (ॲथलेटिक्स ) स्पर्धेसाठी निवड झाली असून कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य क्रीडा मार्गदर्शन व सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी पुढील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या



