इतर

महावितरण च्या वरिष्ठ प्रशासन समावेत वीज कंत्राटी कामगार संघाची दि.16 ऑक्टोबर 2025 ला बैठक

पुणे दि 13

वीज उद्योगात 9 ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या तीन दिवसीय संपास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांनी काळी फित लावून पाठिंबा दिला होता.

याच पार्श्वभूमीवर, महावितरण कंपनीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा. संजय ढोके यांनी कळविले की, दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी संचालक (मानव संसाधन) मा. राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक मुंबई येथे होणार आहे.

या बैठकीत पुढील महत्वाच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे :

हरियाणा पॅटर्नचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करावा.

दिवाळीपूर्वी वेतनवाढीचा फरक, वेतन आणि बोनस रक्कम अदा करावी.

शासनाने वीज कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र वेतन श्रेणी निश्चित करून त्याची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक करावी .

भरती व पुनर्रचनेनंतर कंत्राटी कामगारांना कमी करू नये.

न्यायालयीन प्रकरणातील कामगारांची नावे संपर्क पोर्टलवर संरक्षित कामगार म्हणून दर्शवावीत.

कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहावेत.

या सर्व मुद्द्यांवर जर तोडगा निघाला नाही, तर डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.

राज्याचे ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करून लवकरात लवकर योग्य तोडगा काढावा आणि त्यांच्या खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा, तसेच या बैठकीतून कंत्राटी कामगारांना मोठ्या अपेक्षा आहेत. असे संघटनेचे प्रदेश सरचिटणीस व भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button