संगमनेर साहित्य परिषदेत”वाचन प्रेरणा दिन” संपन्न

संगमनेर- मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून वाचन – प्रेरणा दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी अध्यक्षस्थानी श्री . विजय दिक्षीत व परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तविक सचिव ज्ञानेश्वर राक्षे यांनी केले . उपाध्यक्ष दिलीप उदमले यांनी केले,ते म्हणाले ” अत्यंत सामान्य वागणूक एपीजे अब्दुल कलाम यांची होती. लहानपणापासून ते मिसाईल मॅन पर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांनी लिहीलेली पुस्तके हि लहानमुलांसाठी आणि तरुणांसाठी लिहिली आहेत. मोबाईलपासून मुलांना दूर करणे फार मुश्किल होऊन बसले आहे अशावेळी आपल्या घरात पुस्तकाची रॅक असणे आणि त्यात वाचनीय पुस्तके असणे गरजेचे आहे.”

अब्दुल कलामांच्या स्मृतींना उजाळा देताना शशांक गंधे यांनी सांगितले की ” वाचनाचे संस्कार प्रथम आपल्या कुटुंबातून झाले पाहिजे. ” हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले .
याप्रसंगी माजी प्राचार्य गोंटे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, ” एपीजे अब्दुल कलाम ११ वे राष्ट्रपती होते परंतु सर्वात स्मरणात राहील असे ते होते. एपीजे अब्दुल कलाम यांनी असे म्हंटले होते कि मी अशा जागी बसेल जिथे मला कोणी उठ म्हणणार नाही आणि ते राष्ट्रपतींवर विराजमान झाले.”
अध्यक्षीय भाषणात विजय दीक्षित म्हणाले, ” वाचन चळवळ समृद्ध झाली पाहिजे त्यामुळे वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश म्हणजे वाचन संस्कृती वाढवणे आणि मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन करणे “
आभारप्रदर्शन महेश गोडसे यांनी केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सोमणी यांनी केले आणि त्यांनी छोट्या -मोठ्या पडद्यावरील अभिनेते यांनी देखील वाचनाचे महत्व नमूद केलेल्या वृत्तपत्रीय कात्रणाचे वाचन केले. . बाळकृष्ण महाजन यांनी त्यांच्या गोड आवाजात पसायदान सादर केले. याप्रसंगी परिषदेचे सचिव ज्ञानेश्वर राक्षे ,खजिनदार गिरीष सोमाणी ,सह खजिनदार मनोज साकी, सदस्य महेश गोडसे तसेच विश्वनाथ ठाकरे सर, सुधाकर नेहे व इतर सदस्य उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष अरविंद गाडेकर व इतर सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .



