उन्मेष अभंगगाथा निलादेवी समाधी अभिषेक विश्व मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न…

“”
ढाळेगाव: दिनांक:२३
“उन्मेष अभंगगा था निलादेवी समाधी अभिषेक विश्व मराठी साहित्य संमेलन, ढाळेगाव -लातूर-भारत येथे दिनांक २३/१०/२०२५ रोजी संपन्न झाले.मराठी भाषेचा अखंड सेवा सातत्याने २४ वर्ष पासून भारत देशातील ढाळेगाव या ग्रामगावी सुरू आहे.या मराठी विश्व मराठी संमेलनाची सुरुवात “उन्मेष अभंगगाथा व निलादेवी समाधी यांची पुष्पवृष्टीने पूजा करुन झाली.”विश्वतीत व निलादेवी नाम ” यांचे वाचन झाले.निलादेवी विश्वसंवाद या पवित्र ग्रंथाचे वाचन झाले. मराठी भाषेतील ” उन्मेष अभंगगाथेची प्रेरणा निलादेवी समाधी अभिषक ” झाला .प्रा.उन्मेष शेकडे यांचे हस्ते झाला.ह.भ.प.बबन देव,नरदेव महाराज,माणीक महाराज,स्वामी महाराज,धनजंय महाराज,माने महाराज,मारोती महाराज , गोविंद कोरे, डॉ.व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक मुंबई, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच ह.भ.प.वामन मुंडे महाराज यांनी उन्मेष अभंगगाथा व प्रंसागिक विषयावर रसाळ विवेचन करुन मराठी भाषेचे वैभव उन्मेषअभंगगाथा असल्याचे प्रतिपादन केले. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉ.व्ही.व्ही पोपेरे साहेब आदिवासी सेवक, मुंबई यांनी महाराष्ट्र ही संतांची माय भूमी असल्याने अशा प्रकारचे अभंगांचे लिखित रचना होणे हे आवश्यक होते व ना भूतो ना भविष्य असे ४३००० हजार अभंगाचे लिखित रचना करून ढाळेगाव या गावाचे मान अभिमानाने उंचावलेली आहे. या गावचे सुपुत्र प्रा.उन्मेष शेकडे सर यांनी एक नवा इतिहास रचल्याचे डॉ.पोपेरे यांनी सांगितले
या अभंग गाथांची राज्य शासनाने कुठेतरी दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागात या अभंगांची कुठेतरी रचना मांडणी केली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.पोपेरे यांनी मत व्यक्त केले. तसेच
हरिश्चंद्र शेकडे निमंत्रक म्हणून बोलतांना,”उन्मेष अभंगगाथा ही मराठी भाषेतील मातापिता देव सेवा तत्वं मांडणारी एक महत्त्वाची विचार धारा बनेल असे सांगितले.,प्रा.अशोक गुळवे यांनी विचार मांडतांना,”मराठी भाषेतील एक अजरामर कृती म्हणून ‘उन्मेष अभंगगाथा’ निश्चितच लौकिकास पात्र होईल असे सांगितले ” डॉ.अमोल शेकडे यांनी , मराठी भाषेची अमृतमय विचारांची चळवळ ढाळेगाव येथे ‘उन्मेष अभंगगाथा ” विचारातून वैश्विक मानवी मूल्यं घेऊन चालू असल्याचे” प्रतिपादन केले.”स्वागताध्यक्षीय भाषणात , मराठी वाड्.मय “उन्मेष अभंगगाथा सतेजत्व निर्माण करुन नैतिक मूल्ये मांडताना विज्ञान मूल्यं जोपासेल असे सांगितले.डॉ.बालाजी भंडारे यांनी उद्घाटकीय भाषणात,”उन्मेष अभंगगाथा मराठी भाषेचे उर्जास्त्रोत बनेल असे प्रतिपादन केल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमानिमित्ताने विद्या पुरस्काराचे देखील वितरण करण्यात आले. *१) विश्वकवी उन्मेष शेकडे अभंगगाथा * पुरस्कार.डॉ.वाळीबा पोपेरे आदिवासी सेवक मुंबई (महाराष्ट्र राज्य)यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.तसेच सौ.श्वेता संह,(मास्को रशिया),सौ.स्मृती चौधरी, (उत्तरप्रदेश) श्री धर्मेंद्र जोशी (गुजरात) श्री विपिन भट (राजस्थान) विश्वकवी उन्मेष शेकडे अभंगगाथा विश्व साहित्य ब्राह्मंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व विश्वकवी उन्मेष शेकडे अभंगगाथा प्रेरणा निलादेवी – मारोती ब्राह्मंड पुरस्कार सौ. सुमन राणी – (उत्तराखंड), सौ.रेखा श्रीवास्तव – (मध्यप्रदेश) इत्यादींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उन्मेष हरिश्चंद्र बंधू मातापिता भक्तीसेवा ब्राह्मंड – गोविंद कचोरे या जागतिक पुरस्काराचे वितरण केले. तसेच मा.प्रा.नंदकुमार बालुरे सर यांनी देखील आपल्या भाषणामध्ये उत्कृष्ट व थोड्याच स्वरूपात चांगली मांडणी करून सदरील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.व श्री. गोविंद कचरे उल्हासनगर यांनी देखील आपल्या भाषणामध्ये खूप सुंदर व चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे अशा शुभेच्छा दिल्या.तसेच डॉ.व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक) महाराष्ट्र राज्य यांनी पुरस्काराचे मनोगत व्यक्त करताना जगतिक विश्वकवी उन्मेष शेकडे अभंगगाथा ब्रह्मंड पुरस्काराबद्ल कृतज्ञता व विशेष अतिथी म्हणून बोलतांना म्हणाले, भारत देशातील ढाळेगाव या खेडेगावात गेली २४ वर्ष उन्मेष शेकडे एक लेखकाचे विश्व मराठी साहित्य संमेलन निलादेवी प्रेरणेतून भरते आहे.उन्मेष अभंगगाथा व निलादेवी समाधी अभिषेक पूजन करुन या संमेलनास सुरुवा होते. मराठी भाषेसाठी हा गौरवाचा क्षण आहे.स सकाळी ७.०० वाजता” “उन्मेष अभंगगाथा – निघालेली समाधी अभिषेक पुष्पवृष्टी व विश्वगीत गावून संमेलनास प्रारंभ होतो.यानंतर संमेलनात उन्मेषचे अभंग – काव्यवाचन,निलादेवी विश्वसंवाद वाचन, उन्मेष अभंग परिसंवाद – प्रवचन, मान्यवर,संमेलन उद्घाटक, स्वागताध्यक्ष, निमंत्रक, अतिथी,विशेष अतिथी, संमेलनाध्यक्ष यांची भाषण, उन्मेष अभंगगाथा मराठी भाषा कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन करणारे असतात.उन्मेष शेकडे यांचे युग मराठी भाषा साहित्यात त्यांच्या अभंग लेखनाने निश्चित निर्माण होईल.जगातील सर्व भाषेत वैश्विक नातेबंध,मानवी मूल्यं ,विश्वशांती, मातापिता सेवा आणि स्वंय शुद्ध आचरणाचा संदेशच त्यांच्या अभंगातून व्यक्त होतो.जगातील सर्व भाषेच्या दृष्टीने ही घटनाच म्हत्वाची आहे.”
जगातील ‘उन्मेष अभंगगाथा -४३०००’ विश्व हस्तलिखिताची मिरवणूक मराठी भाषेच्या इतिहासातील व जगातील हृदययंगम अशी निलादेवीच्या जयघोषात काढण्यात आली. व कार्यक्रम ढाळेगाव लातूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 🙏🙏



