इतर

अकोल्यात आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडी चे प्रशिक्षण

श्री एस. के. जाधव
कोकणवाडी प्रतिनिधी दि. 7


ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत व बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत वाकी या ठिकाणी स्ट्रॉबेरी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी रणद खुर्द, रणद बुद्रुक,वाकी,भंडारदरा, गुहिरे येथील शेतकरी उपस्थित होते.

उपस्थित शेतकरी यांना बायफ चे सिनियर प्रोग्रॅम मॅनेजर श्री सुरेश सहाणे यांनी स्ट्रॉबेरी संदर्भात माहिती दिली. स्ट्रॉबेरी पिक हे रोख पैसे मिळुन देणारे पीक आहे तसेच या पिकाची रोग, किड नियंत्रण करणे गरजेचे आहे, पॅकिंग, बाजार पेठ कशी उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणाला बायफचे श्री. राम कोतवाल यांनी स्ट्रॉबेरी लागवडी चे महत्व, लागवड पद्धत , मल्चिंग पेपर चा वापर, ठिबक सिंचन सुविधा, रोप लागवड केल्यानंतर त्यास बुरशीनाशक, कीटकनाशक, ह्युमिक, तसेच नत्र-स्फुरद-पालाश साठीचे खते त्यांचा वापर, खराब पानाची कटिंग करणे, नवीन रोपांना येणारे फुले काढणे, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण, काढणी, विक्री व्यवस्था, विक्री साठी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी लिंक करणे, तसेच पॅकिंग करणे त्यावर लेबल लावणे तसेच स्ट्रॉबेरी विक्री महोत्सव भरविणे या विषयी मार्गदर्शन केले.


तसेच प्लॉट मध्ये जाऊन उपस्थित शेतकरी यांना फवारणी, चूळ देणे, पाने खुडणे या विषयी प्रात्यक्षिक करून माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर व श्री. अरुण बांबळे आणि बायफचे श्री. प्रदीप खोसे, श्री सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बायफ चे राम कोतवाल, विष्णु चोखंडे, निलेश आलवने, मारुती सगभोर, काजल देशमुख यांनी केले.


समृद्ध किसान प्रकल्पाच्या माध्यमातून व ग्राम विकास समितीच्या मदतीने या वर्षी वाकी, भंडारदरा, रणद खुर्द,गुहिरे, रणद बुद्रुक, पेंडशेत, बारी, जहागीरदारवाडी, चिचोंडी, पांजरे या गावांमध्ये एकूण 57 शेतकरी यांनी 5 ते 10 गुंठे वरती लागवड केली आहे, त्यांना प्रकल्पातून ठिबक सिंचन सेट, मल्चिंग पेपर, रोपे, औषधे देण्यात आली.
प्रकल्प प्रमुख श्री विष्णू चोखंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button