इतर

घराबाहेर पडण्यापूर्वी भरपेट खा, बाहेरील पदार्थ खाणे टाळा, – डॉ. नम्रता गुल्लापल्ली

सोलापूर – हल्ली बाजारात विक्री होणा-या पदार्थांमध्ये भेसळीचा प्रमाण वाढलेला आहे. गाय – म्हशींतून दूध जास्त प्रमाणात मिळावे म्हणून काही लोक इंजेक्शन देत आहेत. तसेच प्लॅस्टिकमधून दूधाची विक्री होत आहे. दूधापासून बनविणा-या पदार्थ सुध्दा धोकादायक. त्याचबरोबर प्लॅस्टिकमध्ये खाण्याचा गरम पदार्थ ठेवलेले खाल्यास आरोग्यावर परिणाम होतो. फ्रिजमधील खायचे पदार्थ पुन्हा – पुन्हा गरम करुन खाणे ते अतिरेक होऊन कँसरला आमंत्रण देतो. आजकाल अनेकांना सूर्यप्रकाशात जायला नको वाटते. गेल्याने ‘व्हिटॅमिन डी’ मिळतो. व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यान आणि वॉकिंग करणे हे शरीराच्या फायद्यासाठी आहेत. पूर्वी घरातील खायचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले होते. लिंबू, आवळा, चिंच, संत्री, मोसंबी हे सर्व आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. याचबरोबर प्रामुख्याने शुध्द हळदीचा वापर केल्यास कँसर टाळू शकतो. तसेच चायनीज पदार्थ व त्यापासून होणा-या रासायनिक सॉस यामुळे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. मैद्यापासूनही तयार होणारे पदार्थ खाल्याने माणूस स्थूल होतो. पूर्वीपासून घरात बनवणा-या पदार्थ खाल्याने कुठलाही धोका होत नाही. आणि भूकही मिटतो. म्हणून, शक्यतो घराबाहेर पडण्यापूर्वी भरपेट खा असे आवाहन डॉ. नम्रता गुल्लापल्ली केले आहे.

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’च्या वतीने महिलांसाठी ‘स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय’ हा कार्यक्रम दत्तनगर चौकाजवळील श्री समर्थ क्लिनिक येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी), डॉ. नवनीता रच्चा (गुल्लापल्ली), सखी संघम’च्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, यंत्रमाग धारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी, भाजपाचे ज्येष्ठ रामचंद्र जन्नू यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. गुल्लापल्ली यांनी, कुठल्या पदार्थांपासून कँसर होतो याची माहिती दिले आहे. डॉ. नवनीता रच्चा यांनी महिलांनी दोन महिन्यातून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावे. असे सांगून घरात असताना देखील स्वतःच तपासणी कसे करावे याचे प्रात्यक्षिके दाखवले. उपस्थित महिलांनी आरोग्याच्या समस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्या. सखी संघम’च्या सल्लागार मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर हेमा मैलारी यांनी आभार मानल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखी संघम’च्या कार्याध्यक्षा सविता येदूर, गीता भूदत्त, पल्लवी संगा, वनिता सुरम तसेच फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली, मल्लेशम जोगू हे उपस्थित होते.

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’च्या वतीने आयोजित ‘स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय योजने’संदर्भातील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी). डावीकडून कल्याणी पेनगोंडा, डॉ. नवनीता रच्चा, रामचंद्र जन्नू, अंबादास बिंगी. समोर उपस्थित महिला दिसत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button