आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१२/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २२ शके १९४७
दिनांक :- १२/०१/२०२६,
वार :- इंदुवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१०,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १२:४३,
नक्षत्र :- स्वाती समाप्ति २१:०६,
योग :- धृति समाप्ति १८:१२,
करण :- वणिज समाप्ति २६:००,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- धनु – उतराषाढ़ा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:२८ ते ०९:५१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहुर्त — सकाळी ०७:०५ ते ०८:२८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:५१ ते ११:१४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:२४ ते ०४:४७ पर्यंत,
अमृत मुहुर्त — संध्या. ०४:४७ ते ०६:१० पर्यंत,
❀ दिन विशेष:
सिध्देश्वर यात्रा ४ दिवस सोलापूर, यमघंट २१:०६ नं., घबाड २१:०६ नं., भद्रा २१:०६ नं., भद्रा २६:०० नं., दशमी श्राध्द,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २२ शके १९४७
दिनांक = १२/०१/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)
मेष
पारमार्थिक उन्नतीला प्राधान्य द्याल. कर्मठ पणे मत मांडाल. वडिलधाऱ्यांचा योग्य तो मान ठेवावा. सेवावृत्तीने कामे कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल.
वृषभ
आरोग्याबाबत हयगय करू नये. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. काही गोष्टींमध्ये संयम बाळगावा लागेल. मानसिक स्थैर्य जपावे.
मिथुन
वाणीतील गोडवा जपावा. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. जोडीदाराच्या संयमाचे कौतुक कराल. शांतपणे विचार करावा. वैचारिक प्रौढता दाखवाल.
कर्क
वैवाहिक सौख्यात भर पडेल. उदार मतवादी असाल. आळस दूर सारावा. कामाचे समाधान मिळेल. कणखरपणे आपले विचार मांडावेत.
सिंह
व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. मुलांशी वादाचे प्रसंग टाळावेत. ज्ञानाचा योग्य वापर करण्याची संधी मिळेल. मानसिक व्यग्रता टाळावी. सखोल ज्ञानावर भर द्याल.
कन्या
स्त्री सहवासात रमाल. सामाजिक दर्जा सुधारण्यास मदत होईल. सतत प्रयत्नशील रहाल. शांत, निवांत वातावरणात रमाल. चांगले गृहसौख्य लाभेल.
तूळ
मानाने पैसा कामवाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल. मुलांच्याबाबत दक्षता बाळगावी. प्रवास चांगला होईल.
वृश्चिक
स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल. स्थावरची कामे निघतील. काटकसरीने वागाल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. जुन्या कामात वेळ जाईल.
धनू
कामातील अडथळे दूर सारावेत. आपला दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. चिकाटीने कामे हाती घ्याल. निराशा दूर सारावी. तुमची वागणूक आदर्श असेल.
मकर
राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या निश्चयावर खुश असाल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. सहकुटुंब प्रवासाचे बेत आखाल. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ
कामाचा उरक चांगला असेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यपद्धतीत सुधारणा कराल. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवा. जुने मित्र भेटतील.
मीन
बौद्धिक गोष्टीत लक्ष घालाल. आवडती वस्त्रे खरेदी कराल. चोखंदळपणा दर्शवाल. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवा. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
