कृषी

समृध्द किसान प्रकल्पांतर्गत रणद बुद्रक येथे, प्रवरा मेडिकल ट्रस्टमार्फत रोग निदान शिबिर संपन्न

एस.के. जाधव

कोकणवाडी (ता अकोले) दि. 20

, ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत व बायफ (BISLD), नाशिक संचलित समृध्द किसान प्रकल्पांतर्गत रणद बुद्रक ता अकोले येथे प्रवरा मेडिकल ट्रस्टमार्फत विविध रोग निदान शिबिर पार पडले या शिबिरात १२६ नागरिकांना विविध आजारांवर तपासण्या करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले.शिबिरात मोफत रक्तगट, HB, BP, शुगर तपासणी करून मेडिसन प्रदान करण्यात आले.

ए.एस.के. फाऊंडेशनकडून श्री. सिद्धार्थ अय्यर आणि श्री. अरुण बांबळे, तसेच बायफ (BISLD), नाशिककडून श्री. प्रदीप खोसे आणि श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बायफकडून श्री. राम कोतवाल (बायफ), श्री. विष्णु चोखंडे, श्री. मच्छिंद्र मुंढे, वर्षा भागडे आणि काजल देशमुख यांनी शिबिराचे संपूर्ण आयोजन केले.

प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी अंतर्गत डॉ. दिग्विजीराज जोशी, डॉ. कृष्णा मधे, आशा लेंडे, ज्योती नागरे, सुनीता भागडे, गीतांजली बांगर, संदीप झडे, रोहिदास गंभीरे, पांडुरंग भांगरे आणि जयराम झडे यांनी शिबिरासाठी मेहनत घेतली.

एकूण ४४ महिलांचा हिमोग्लोबिन तपासण्यात आला, त्यापैकी १८ महिलांचे HB ६–८ च्या दरम्यान आणि २६ महिलांचे ९–१२ च्या दरम्यान होते. २८ महिलांचे ब्लड शुगर तपासण्यात आले, त्यातील ५ जास्त आणि २३ सामान्य होते.

डॉ. दिग्विजय जोशी म्हणाले की, या महिला मेहनती असल्या तरी त्यांच्या दैनंदिन आहारात पौष्टिक अन्नपदार्थ घेत नसल्यामुळे हिमोग्लोबिन प्रमाण कमी आढळून येते. या महिलांना लोहवर्धक गोळ्या देण्यात आल्या.

शिवाय,यावेळी महिलांना पौष्टिक आहार घेण्यासाठी समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत गवती चहा, शेवगा, कडीपत्ता, आंबा, पेरू, लिंबू, पपई आणि अंजीर यासारख्या पौष्टिक झाडांची वाटप करण्यात आली-

————–+———–

.

ग्रुप मधे सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा 👇

https://chat.whatsapp.com/DtNO2iPaWBj4WjJLS95NDd?mode=ems_copy_t

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button