कोतुळकरांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा!

कोतुळ प्रतिनिधी
राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघाताने बारामतीत दुर्दैवी निधन झाले त्यांच्या अचानक अकाली जाण्याने कोतूळ परिसरात तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले
कोतुळ ता अकोले येथे आज गुरुवारी सकाळी सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला
यावेळी कोतुळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी शोकसभा घेतली या सभेत अनेकांनी अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला

मुळा नदीत पाणी उपलब्ध नसताना पिंपळगाव खांड धरणाच्या कामाला शासनाची मंजुरी अजितदादांनी कशी मिळून दिली, आणि पिंपळगाव खांड धरणामुळे परिसराची शेती कशी फुलली यावर प्रकाश टाकला

आंबित धरण, पळसुंदे धरण, येसरठाव धरण, या परिसरातील धरणांसाठी माजी मंत्री कै मधुकरराव पिचड यांच्या माध्यमातून मुळा परिसराच्या विकासाला लाभलेले अजित दादांचे योगदान याची आठवण करून दिली राज्यातील सत्ता परिवर्तन नंतर अजित दादांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात आमदार डॉ किरण लाहमटे यांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेख यावेळी करण्यात आला

अनेक वेळा विकास कामांचेभूमिपूजन,उद्घाटन, शेतकरी मेळावे, प्रचारसभा, या निमित्ताने अजितदादांच्या अकोल्यात येण्याच्या अनेक घटनाक्रमांना यावेळी उजाळा देण्यात आला
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख,जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख,अगस्तीचे संचालक मनोज देशमुख, माजी संचालक बाळासाहेब देशमुख, भाजपाचे सोमदास देशमुख, कोतुळ चे माजी सरपंच राजू पाटील देशमुख, अकोले तालुका वारकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ महाराज शेटे, पळसुंदे चे सरपंच पांडुरंग कचरे,भाऊ दाजी पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब देशमुख, रवींद्र आरोटे, पत्रकार सुनील गीते, संजय लोखंडे, विनोद देशमुख,जिल्हा परिषद चे भावी सदस्य कुंडलिक गंभीरेयांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली

यावेळी कोतूळ चे सरपंच भास्कर लोकरे उपसरपंच संजय देशमुख, बोरीचे सरपंच शरद साबळे, हेमंत देशमुख आदीं स ह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


