टाकळी ता अकोले येथील प्राथमिक शाळेस डिजिटल फ्लेक्स कमान भेट!

– अभूतपूर्व उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न
अकोले: प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी ता अकोले येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी टाकळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण केले .
प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय कार्यक्रमाचे औचित्य साधून टाकळी गावचे सुपुत्र व हल्ली श्रीरामपूर येथे स्थायिक झालेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नवनाथ अकोलकर यांनी आपुलकीच्या मिशन अंतर्गत त्यांचे पिताश्री कै. सखाहरी फकिरबा पा. अकोलकर यांचे स्मरणार्थ टाकळी शाळेस सुमारे ९०००/- रुपये किंमतीची स्टार डिजिटल फ्लेक्स कमान भेट देवून सामाजिक बांधिलकी जपली.
या निमित्ताने नवनाथ अकोलकर व त्यांचे बंधु दादा पाटील अकोलकर यांचा टाकळी ग्रामस्थांकडून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
याखेरीज सेवाभावी शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व दादा पाटील तिकांडे, रामहरी तिकांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष निलेश भरीतकर यांचा देखील शालेय विकासकामांच्या विशेष योगदानासाठी सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध स्पर्धा प्रकारात सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदर्श ग्रामपंचायत टाकळी तर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी मेजर भाऊसाहेब दिघे, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, विठे आरोग्य केंद्राचे डॉ. मोरे, सरपंच दत्तु भाऊ गरूड, पोलीस पाटील रामदास तिकांडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब फोडसे, पोपटराव शेवाळे, संतोष तिकांडे, डॉ.जनार्दन मोरे, दत्ताराम दातखिळे, डॉ. उज्ज्वला वैद्य, ग्रामविकास अधिकारी हासे, संतोष नाईकवाडी, नामदेव गाडे, विजय दातखिळे, शिवाजी तिकांडे, सागर तिकांडे, शोभा भरीतकर, विद्या तिकांडे व अंजुम शेख उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीनिवास पोतदार, दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख, कैलास झोळेकर, श्रीकांत मेंगाळ, संगिता धिंदळे, शुभांगी साबळे, कल्पना पवार , नीता लेंभे व आल्हाट मामा यांनी विशेष परिश्रम घेतले.
टाकळी शाळेसाठी लोकसहभग देणाऱ्या दात्यांचे व शिक्षकांचे अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, बीट देवठाण शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे यांनी कौतुक केले.
——–


