इतर

अकोले (माळीझाप) ते कानिफनाथ मढी पायी दिंडी चे प्रस्थान

अकोले (प्रतिनिधी)

अकोले शहरातील माळीझाप येथील कानिफनाथांची पालखी व काठी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीपासून सुरू होणाऱ्या चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी येथून पारंपारिक पायी दिंडी व काठी पदयात्रेचे मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी अकोले शहरातून प्रस्थान झाले.


अकोले माळीझाप येथील अनेक वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे होळीच्या दिवशी सकाळी काठीची मिरवणूक काढण्यात आली.सायंकाळी होळी पेटवल्यानंतर पुन्हा काठी डफ,ढोल,ताशे गजरात संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी जेष्ठ नागरिक, महिला व पुरुषांच्या हस्ते पालखी रथाचे व काठीचे पूजन करण्यात आले.
मढी यात्रेमध्ये माळीझाप अकोले येथील पारंपारिक डफ काठीला विशेष धार्मिक मान दिला जातो.रंगपंचमीच्या दिवशी या काठीचे आगमन यात्रेतील महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो.माळीझाप अकोले गावासाठी ही पदयात्रा श्रद्धा व परंपरेचा अभिमानाचा विशेष क्षण ठरते. पदयात्रेचा मार्ग अकोले संगमनेर,लोणी, कोल्हार, टाकळीमिया, आरडगाव शनिशिंगणापूर मंदिर, घोडेगाव,मिरी मार्गे राहणार असून रंगपंचमीच्या आदल्या दिवशी तिसगाव येथे व मढीत पालखी सोहळा पोहोचेल. अशी माहिती मच्छिंद्र मंडलिक,प्रमोद मंडलिक यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button