कोतुळेश्वर विद्यालयास इमारत बांधकामा साठी भरीव निधी देऊ – खासदार भाऊसाहेब वाकचौरे

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नवीन शालेय इमारत बांधकामासाठी CSR फंड व खासदार निधीतून भरीव निधी देवू असे आश्वासन शिर्डी लोकसभा मतदार संघांचे खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले
या संदर्भात शाळेला बांधकामा साठी निधीची मागणी करण्यासाठी आज दिनांक -03/03/2026 रोजी विद्यालयाचे प्राचार्य श्री. देशमुख बी. के. , पर्यवेक्षक श्री. गोडे जे. बी. , शिक्षण तज्ञ श्री.गणेश घोलप (पंचायत समिती, अकोले ) शिवसेना युवा नेते श्री.विनोद देशमुख, श्री. दीपक बोऱ्हाडे ,श्री.संकेत लांडे ,श्री.लांघी यांनी शिर्डी येथे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेतली
विद्यालयासाठी भरीव अशी देणगी व निधी मिळावा यासाठी सर्वांच्या वतीने प्रयत्न केले.निधी व देणगी लवकरात लवकर मिळवून देऊ असे साहेबांनी सांगितले आहे.यावेळी साहेबांचा सत्कार करण्यात आला.
विद्यालयासाठी सीएसआर फंडातून तसेच खासदार निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांचा विद्यालयाचे वतीने सत्कार करण्यात आला


