“सत्संग सोहळा” कार्यक्रमा वरून अकोल्यातील करंडी गावात वाद!

. अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील करंडी येथे निरंकारी सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने विशेष सत्संग सोहळा आयोजित केला आहे
आज शनिवार दि. १४/३/२०२६ रोजी सायं. ६ ते ९ वा. प. आ. महेश राऊत जी (झोन प्रचारक, पुणे).यांच्या पावन उपस्थितीमध्ये होणाऱ्या या सोहळ्या च्या आयोजना वरून गावांत मात्र वा द निर्माण झाला आहे यामुळे प्रशासन काय भूमिका घेते या कडे लक्ष लागले आहे
करंडी येथील वैभव निवृत्ती गोंदके यांनी या कार्यक्रमा बाबत पोलिसांत तक्रार दिली आहे त्यात म्हटले आहे की आमचे गाव करंडी, ता. अकोले, जि. अहमदनगर हे अनुसूचित आदिवासी क्षेत्र असून Panchayats (Extension to Scheduled Areas) Act, 1996 (PESA Act) तसेच महाराष्ट्र PESA नियम २०१४ अंतर्गत येते. दि. १४/०३/२०२६ रोजी सायं. ६.०० ते ९.०० वा. दरम्यान गावात “विशेष सत्संग सोहळा” नावाचा बाह्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे परंतु सदर कार्यक्रमासाठी: ग्रामसभेची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही ग्रामपंचायतीने अधिकृत परवानगी दिलेली नाही. कार्यक्रम बाहेरील व्यक्तींमार्फत आयोजित केला जात आहे. PESA Act, 1996 नुसार अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभा ही गावातील स्वशासनाची सर्वोच्च संस्था असून स्थानिक सामाजिक, सांस्कृतिक व पारंपरिक बाबींवर निर्णय घेण्याचा अधिकारग्रामसभेला आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 244(1) व पाचवी अनुसूची अंतर्गत आदिवासी क्षेत्रांचे संरक्षण व स्वायतता सुनिश्चित केली आहे. सदर कार्यक्रमामुळे गावातील सामाजिक समन्वय व शांततेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. PESA कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आपण तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे
या कार्यक्रमाचे आयोजना वरून गावांत संघर्ष निर्माण होत असल्याने पोलीस प्रशासन काय भूमिका घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे



