इतर

नेप्तीत सावता महाराज मंदिरा समोर स्वातत्र दिन साजरा


बाबासाहेब जाधव यांच्या  हस्ते ध्वजारोहण, 
===============

देशाला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही  – बाबासाहेब जाधव

अहिल्यानगर : प्रतिनिधी-

नगर तालुक्यातील नेप्ती गावात स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत सावता महाराज तरुण मंडळाच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पहाटेपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते

स्वातंत्र्य दिनानिमित्त सावता महाराज मंदिरासमोरील ध्वजस्तंभ परिसरात सडा टाकून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती आणि तिरंगी फुलांनी संपूर्ण जागेची सजावट करण्यात आली होती. सकाळी नेप्ती विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगे झेंडे घेऊन गावातून भव्य प्रभात फेरी काढली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “इन्कलाब जिंदाबाद” च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या या फेरीचे नागरिकांनी घरासमोर उभे राहून स्वागत केले. प्रभात फेरी सावता महाराज मंदिराच्या पटांगणात आल्यानंतर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी नंदनवन उद्योग समूहाचे संचालक बाबासाहेब भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर सर्व उपस्थितांनी उभे राहून राष्ट्रगीत आणि “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत गायले. यावेळी माजी सरपंच अंबादास पुंड, पाराजी चौरे ग्रामपंचायत सदस्य संतोष चौरे ,ओंकार भुजबळ ,माजी
पंचायत समिती सदस्य देवा होले, पोलीस पाटील अरुण होले, प्राध्यापक भाऊसाहेब पुंड , समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, शाखाध्यक्ष शाहूराजे होले, तुषार भुजबळ, तेजस नेमाने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर ,माजी सरपंच दिलीप होळकर, माजी चेअरमन विलास जपकर , बाळासाहेब बेल्हेकर, सिताराम पुंड, कानिफ कळमकर, दत्ता कळमकर, सतीश होळकर, मुख्याध्यापक बाबा भोर , नानासाहेब घोडके , आशा ढोले, नेप्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक , विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बाबासाहेब जाधव म्हणाले, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. भगतसिंग, राजगुरू, सावरकर, महात्मा गांधी आणि असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताने हे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यांच्या त्यागाला आपण विसरता कामा नये. खरे स्वातंत्र्य म्हणजे रोजच्या जीवनात देशासाठी काहीतरी चांगले करणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीच उद्याचे भविष्य आहात. तुम्ही चांगले शिक्षण घ्या, चारित्र्यवान बना आणि देशाचे नाव जगात उज्ज्वल करा. गावात स्वच्छता ठेवा आणि एकमेकांना मदत करा. कारण स्वातंत्र्य टिकवणे हीच खरी देशभक्ती आहे. गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी अनेक शूरवीरांनी प्राणाची प्राणाची आहुती दिली आहे. अनेकांनी बलिदान दिले आहे. देशाला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही असे प्रतिपादन बाबासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संत सावता महाराज तरुण मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांमध्ये खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संत सावता महाराज तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button