अकोल्यात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला

अकोले प्रतिनिधी
जादुगार पी.बी.हांडे सोशल फौंडेशन चे वतीने देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला वीरमाता अंजीना खरबस यांच्या हस्ते झेंडावंदन केले .कार्यक्रम अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्य कर्ते शांताराम गजे होते.संस्था अध्यक्ष जादुगार हांडे यांनी प्रास्ताविकात संस्था कार्य व स्वातंत्र्य दिन महत्व विषद केले.
सदर कार्यक्रमातील कविसम्मेलनात मंदाकिनी हांडे यांनी प्रबोधन गीत तर देशमुख सरांनी कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणात शांताराम गजे सरांनी सध्याच्या परिस्थितीत संस्थेचे कार्य प्रेरणादायक व कौतुकास्पद असल्याचे नमुद केले.
सदर सोहळ्यास जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलीक, मनोहर तळेकर. सुनील मंडलिक. डाॅ.सुभाष आरोटे,खंडू मंडलिक, मेजर रामदास गोरडे, अण्णासाहेब आढाव, बी.टी.जोरवर, लोखंडे तात्या,निता साळवे,मेजर गभाले,भोसले सर, जालिंदर गायकर इ.मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येन ऊपस्थित होते.
कार्यक्रम आभार प्रदर्शन संस्था सचिव विकास आरोटे यांनी केले.तसेच या बहारदार सोहोळ्याचे सुंदर सुत्रसंचालन संचालक श्रीमती पुष्पाताई नांईकवाडी यांनी केले.



