आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१६/०३/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २५ शके १९४७
दिनांक :- १६/०३/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३८,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३८,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति ०९:४१,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति ३०:२२,
योग :- शिव समाप्ति ०९:३७,
करण :- गरज समाप्ति २१:३८,
चंद्र राशि :- मकर,(१८:१४नं. कुंभ),
रविराशि – नक्षत्र :- मीन – पू.भा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. १०प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:०८ ते ०९:३८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:३८ ते ०८:०८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:३८ ते ११:०८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०८ ते ०६:३८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
सोमप्रदोष, त्रयोदशी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २५ शके १९४७
दिनांक = १६/०३/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)
मेष
तुमचे व्यक्तिमत्व उठावदार ठरेल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पहाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. करमणुकीचे कार्यक्रम ठरवाल. हौसेला अधिक महत्व द्याल.
वृषभ
मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी मनात नसतांना कराव्या लागतील. पत्नीची उत्तम साथ मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जपून राहावे. काही गोष्टींची गुप्तता पाळाल.
मिथुन
इतरांना सहृदयतेने मदत कराल. नवीन लोकांशी मैत्री कराल. स्त्रियांच्या ओळखीने कामे पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. तुमची समाजप्रियता वाढेल.
कर्क
औद्योगिक वातावरण चांगले राहील. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. आवडीचे खाद्यपदार्थ खाल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीच्या वस्तूंची आवड दर्शवाल.
सिंह
परोपकारी वृत्तीने मदत कराल. वाचनाची आवड जोपासाल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. धार्मिक कामात मदतीचा हात पुढे कराल. शैक्षणिक अडचण दूर होईल.
कन्या
काही कामे कमी वेळेत पूर्ण होतील. सासुरवाडीचे लोक भेटतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल.
तूळ
जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. भागीदाराशी एकोपा वाढवावा. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्य वाढेल. एकमेकांशी समजूतदारपणे वागाल.
वृश्चिक
कामात क्षुल्लक कारणाने अडचणी येऊ शकतात. उधार-उसनवारीचे व्यवहार करू नयेत. आपल्या कडून कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. दूरगामी विचारांना चालना द्यावी.
धनू
डावपेच आखूनच वाटचाल कराल. प्रलोभनाला बळी पडू नका. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. बोलतांना आवेग आवरता घ्यावा. दिखाऊपणाला भुलून जाऊ नका.
मकर
कामात अधिक जोम येईल. सुप्त कलागुणांना वाव द्यावा. प्रतिष्ठितांच्या भेटीचा योग येईल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी केल्या जातील. कुलदेवतेची आराधना करावी.
कुंभ
सामुदायिक वादात अडकू नका. पारमार्थिक बळ वाढवाल. गप्पिष्ट लोकांच्यात वेळ घालवाल. आपले मत उत्तम प्रकारे मांडाल. घरात नातेवाईक गोळा होतील.
मीन
मुलांच्या हट्टाला बळी पडाल. मानसिक ताण वाढू शकतो. कामात गतीमानता येईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. मानसिक चंचलतेवर मात करावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



