इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१९/०३/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २८ शके १९४७
दिनांक :- १९/०३/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३९,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति ०६:५४, प्रतिपदा २८:५३,
नक्षत्र :- उत्तराभाद्रपदा समाप्ति २८:०५,
योग :- शुक्ल समाप्ति २५:१७,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति १७:५६,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ.भा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:०७ ते ०३:३८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:३५ ते ०८:०६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३७ ते ०२:०७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०७ ते ०३:३८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०८ ते ०६:३९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
गुढीपाडवा ६:५४ नं., अभ्यंगस्नान, कडुनिंबाचे चूर्ण खाणे, कल्पादि, पंचांगस्थ गणपति पूजन, मारवाडीय संवत् २०८३ कालयुक्तनाम संवत्सर, वत्सराधिपति गुरु पूजन, इष्टि,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २८ शके १९४७
दिनांक = १९/०३/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बोलताना वाणीत गोडवा ठेवाल. गायक लोकांचे कौतुक केले जाईल. झोपेचे तक्रार जाणवेल. चटपटीत पदार्थ चाखाल.

वृषभ
सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वागणूक प्रेमळपणाची असेल. आल्या गेल्याचे उत्तम स्वागत कराल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. प्रलोभनाला बळी पडू नका.

मिथुन
चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. जोडीदाराच्या सौख्यात रममाण व्हाल. स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावध सहा. मानसिक चंचलता जाणवेल.

कर्क
मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मुलांच्या कला गुणांचे कौतुक कराल. हौस मौज पूर्ण करून घ्याल. स्त्रियांच्या सहवासात वावराल.

सिंह
कामे मनाजोगी पार पडतील. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल. काही कामे अकारण खोळंबतील. वात-विकाराचा त्रास जाणवेल.

कन्या
परोपकाराचे महत्व समजून घ्याल. धार्मिक कामांत हातभार लावाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सर्वांना सहृदयतेने मदत कराल. नातेवाईकांशी विसंवाद टाळावा.

तूळ
कामातून समाधान शोधाल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.

वृश्चिक
गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. मित्रा मंडळींचा गोतावळा जमा कराल. उत्तम गृह सौख्य लाभेल. पत्नीचे विचार आग्रही वाटू शकतात. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल.

धनू
नोकर-चाकरांचे सौख्य मिळेल. भावंडांची मदत घेता येईल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आपल्या काही गोष्टींचे परिक्षण करावे.

मकर
व्यावहारिक बुद्धिमत्ता वापरावी. काही गोष्टींचा सारासार विचार करावा. फार खोलात जाऊन अर्थ काढू नयेत. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.

कुंभ
अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तुमचा अंदाज बरोबर ठरेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. सामुदायिक भानगडीत लक्ष घालू नका. नसत्या वादविवादात अडकू नका.

मीन
मित्रांशी मतभेद संभवतात. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कानाच्या विकारांवर वेळीच उपाय करावेत. कष्टाला मागे पुढे पाहू नका. फसव्या लोकांपासून दूर राहावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button