इतर

अकोले तालुक्यातील मवेशी येथे संत संमेलन व दर्शन सोहळ्याचे आयोजन

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील श्रीक्षेत्र मवेशी येथे संत संमेलन व दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे

धन्वंतरी ग्रुप, सदगुरु बाळानंद सरस्वती भक्त मंडळ, मवेशी च्या वतीने श्री क्षेत्र धन्वंतरी मंदिर, मवेशी ता.अकोले जि. अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथे मंगळवार दि.२४/०३/२०२६ रोजी सायंकाळी ५ वा. भव्य विशाल राष्ट्रीय संत संमेलन आयोजित केले आहे
अकोले तालुक्यातील मवेशी येथे हरिचंद्रांच्या पावन भुमीत देशातील तपस्वी साधु-संतांचे आगमन होत आहे यावेळी दिप प्रज्वलन, संत पुजन, ध्वज पुजन, गो पुजन, तसेच सयुंक्त तत्वावधान संत समिती उपस्थित साधु संतांच्या आशीर्वादाने श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर आयुर्वेदाचार्य डॉ.बाळानंद सरस्वती महाराज यांना राष्ट्रसंत पद प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर आमंत्रित मान्यवरांचे सत्कार, उपस्थित साधु संतांचे आशीर्वचन, विश्वप्रार्थना व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे

यावेळी शांतीब्रम्हा मारुती महाराज कुल्हेकर (बाबा ) प. पु. महंत श्री. रामनारायणदानजी, श्री. श्री १००८ स्वामी प्रयाग जी महाराज,आचार्य प.पु. रामनारायणजी,द्विवेदी,धर्मगुरु श्री श्री. १००८ स्वामी ओम,आचार्य महामंड,स्वामी माधवानंद सरस्वती,स्वामी श्रीनंद, श्रीमहंत योगीनाथजी,स्वामी हरे कृष्णा महाराज,ह.भ.प. पुरुषोतम महाराज मोरे,ह.भ.प. माणिक महाराज मोरे,श्री.श्री.धर्मका भट्ट,ह.भ.प. रामदास महाराज चौधरी, श्री. गिरीजी महाराज नांगली, राष्ट्रीय धर्मगुरु सितामायी (भावी),श्री. प्रविणनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराज,महंत रामकृष्ण दान महाराज,प.पु.स्वामी सत्यशोधानंदजी महाराज,श्री महंत रंगनाथजी महाराज,प.पु. स्वामी भगवानगिरी महाराज,ह.भ.प. तुकाराम (भाऊ) महाराज,स्वामी दिगंबरानंद गिरी महाराज,स्वामी शिवगिरी महाराज,महंत दायनंद सरस्वती महाराज, प. पु. स्वामी योगानंदजी सरस्वती, श्री. श्री १००८ महामंडलेश्रर डॉ. बाळानंद सरस्वती महाराज,ह.भ.प. सुभाष महाराज,गोविंदराव पवार, ह.भ.प.नामदेव महाराज हरड आदी संत महात्मे उपस्थिती राहणार आहे

तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहुन या अलौकिक आणि भव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button