घटस्फोट’ आणि’लग्नाळूंच्या अपेक्षा’ – काल, आज आणि उद्या..यावर ‘चर्चासत्र’.!

सोलापूर : कुटूंबातील किमान एक व्यक्ती ‘शिक्षित’ व ‘संस्कारी’ असल्यास कुटुंबाची ‘प्रगती’ होते, त्याचबरोबर समाजाची प्रगती होते. असे म्हणतात. गेल्या ८-१० वर्षापूर्वी पासून ‘उच्चशिक्षित’ झालेल्या काहींच्या ‘अपेक्षा’मध्येही वाढ झाले आहे. असे म्हणायला हरकत नाही. आधुनिक युगात, आधुनिक विचार व आधुनिक जीवनशैलीमुळे घटस्फोट घेण्यामध्येही वाढ झाले आहे. तसेच ‘अपेक्षांमुळे’ लग्न जुळत नसल्याने ‘लग्नाळूंची’ संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘पेन्ली’ – ‘लग्न’ या अडीच शब्दांमध्ये ‘आदर’ होता, आहे. आणि पूर्वी ज्येष्ठांच्या शब्दांमध्ये ताकद होते, तसे दिसायचे व मानही होता. पण, काळाच्या ओघात ज्येष्ठांची कमतरता आणि मार्गदर्शन कमी झाल्याने अडचणी निर्माण होत आहे. समंजसपणाचा अभाव आणि इगो यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. ‘सध्या’ लग्न म्हणजे एकप्रकारे ‘इव्हेंट’ झाल्यासारखे वाटते. आधुनिक विचाराचे वधू आणि वर हे लग्नविधी कडे फारसे गंभीरपणे न घेता केवळ मित्र- मैत्रिणींच्या घोळक्यात राहणे यामध्ये जास्त रस दाखवतात. यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच लग्नाळूंच्या अपेक्षाही दिवसेंदिवस वाढत असल्याने लवकर लग्न जुळून येत नाही.
पद्मशाली समाजासह इतर समाजातही ही एक सामाजिक गंभीर वास्तव प्रश्न कुठेतरी थांबले पाहिजे या हेतूने सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघम आयोजित आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने शनिवार दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक (शार्प) ५.३० वाजता कन्ना चौक जवळील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या ‘विणकर सभागृहात’ चर्चासत्राचे (मंथन) आयोजन केले आहे. या चर्चेत भाग घेण्यासाठी पद्मशाली समाजातील सूज्ञ, प्रतिष्ठित, बुद्धीजीवी आणि ज्यांच्याकडे अनुभवाचे भांडार असलेल्या बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले मत व्यक्त करावे, असे आवाहन पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी (काका), फाउंडेशन व सखी संघम’चे संस्थापक – गौरीशंकर कोंडा, प्रेसिडेंट लक्ष्मण दोंतूल, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, नागेश पासकंटी, नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, वैकुंठम् जडल, श्रीनिवास पोटाबत्ती, ओमसी पल्ली, पद्मशाली सखी संघमच्या सचिवा कु. रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर, ममता तलकोकूल, पल्लवी संगा, वनिता सुरम, गीता भूदत्त, मेघा इट्टम, ममता मुदगुंडी, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, स्वाती बोगा (इराबत्ती), भाग्यलक्ष्मी तुम्मा यांनी केले आहे.
या चर्चासत्रेत सहभाग होण्यासाठी पुणे येथून काही समाज बांधव येत आहेत. ज्यांना या चर्चासत्रेत सहभागी होण्याची इच्छा असूनही येऊ शकत नाहीत किंवा वेळ जमत नसेल त्यांनी “वर्षा रबर स्टँप, १३०४ भद्रावती पेठ, सोलापूर- ५.” या पत्त्यावर थोडक्यात लिहून पाठवावेत. असेही आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले.



