बचत गटा तून उभी राहिली सामाजिक बांधिलकी;

अगस्ती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम!
अकोले प्रतिनिधी
शाळेतील मैत्री ही केवळ आठवणींपुरती मर्यादित न ठेवता, ती एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभी करण्याचा निर्धार समशेरपूर येथील अगस्ती विद्यालयाच्या १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या वर्ग मित्रांच्या मुलीच्या लग्नाला ऋणानुबंध मैत्री बचत गटाकडून कन्यादान करण्यात आले.हा उपक्रम सुरू केला असून, नुकतीच याची दुसरी मदत सुपूर्द करण्यात आली.
मासिक बचतीतून मदतीचा डोंगर:
या बॅचमधील सर्व मित्रांनी मिळून दरमहा ५०० रुपये मासिक बचत करण्याचा संकल्प केला आहे. या संकलित निधीतून ग्रुपमधील कोणत्याही सदस्याच्या मुला-मुलीचे लग्न असो किंवा अचानक ओढवलेले वैद्यकीय संकट, अशा वेळी आर्थिक आधार दिला जात आहे.
दुसरे कन्यादान: 30000 रुपयांची मदत सुपूर्द करून कन्यादान केले.
ग्रुपचे वर्गमित्र श्री. राहुल बेनके यांच्या मुलीच्या (ज्ञानेश्वरी ) चे लग्नानिमित्त त्यांना ग्रुपच्या वतीने 30000 रुपयांचा मदत निधी अत्यंत आपुलकीने सुपूर्द करण्यात आला. “मित्राच्या मुलीचे लग्न म्हणजे आपल्याच घरचे कार्य” या भावनेतून सर्व मित्रांनी या आनंदाच्या क्षणात आपला सहभाग नोंदवला.
संकटातही मैत्रीचे कवच:
केवळ लग्नसमारंभच नव्हे, तर एखाद्या मित्रावर वैद्यकीय उपचार (Medical Emergency) घेण्याची वेळ आल्यास, मुलांचे शिक्षण, मुलीचे शिक्षण,त्याला या निधीतून तातडीची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आजच्या महागाईच्या काळात अशा प्रकारची सामूहिक मदत सर्वच मित्रांसाठी मोठे कवच ठरत आहे.
अगस्ती विद्यालयाच्या या माजी विद्यार्थ्यांच्या एकीचे आणि या अनोख्या ‘बचत गटाचे’ समशेरपूर परिसरात व शिक्षक वर्गाकडून विशेष कौतुक होत आहे.. ऋणानुबंध मैत्री बचत गटाचे अध्यक्ष रामदास बेनके, उपाध्यक्ष श्रीकांत उघडे सचिव राम कोतवाल, अमजद शेख ,आशिष तळेकर
नंदू मंडलिक -भिवा सदगीर-अरुण बेनके ,विलास दराडे
राहुल बेनके ,दीपक जगताप,रामचंद्र मेंगाळ ,किसन मोखरे
बंडू सदगिर ,संतोष भालेराव सुबोध भोसले ,खंडू ढोन्नर
तुकाराम मोखरे ,बहिरु सदगीर संपत सहाणे,देवराम घोडसरे
निवृत्ती ढोन्नर, संतोष मंडलिक, जमील शेख ,मधुकर बेनके, दीपक शिंदे,धोंडीराम बेनके विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा सामजिक बांधिलकी जपण्याचे काम सुरू केले आहे.



