अकोल्यात वाणिज्य शाखेत सर्व प्रथम आलेल्या कु. पूर्वा जाजू चा केला सत्कार!

अकोले (प्रतिनिधी) –
एच.एस.सी. वाणिज्य शाखेत अकोले तालुक्यात सर्वप्रथम व मॉडर्न कॉलेज मध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत सर्वप्रथम आलेल्या कु. पूर्वा जाजू चा मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज-अकोले चे शिक्षक तसेच अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या पदाधिकार्यांनी निवासस्थानी येवुन सत्कार केला.
येथील मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ची विद्यार्थीनी कु. पूर्वा ज्योती धनंजय जाजू हिने एच.एस.सी. (वाणिज्य) परिक्षेत 87.83 टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. कु. पूर्वा हि मॉडर्न कॉलेज च्या कला, वाणिज्य व विज्ञान विभागात प्रथम आली असुन, वाणिज्य शाखेत अकोले तालुक्यात सर्वप्रथम आली. या निमीत्ताने तिला सन्मानित करण्यात आले. कु. पूर्वा ने यापूर्वी देखील एस.एस.सी. परिक्षेत हायस्कुल मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला होता. तर संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त करून अकोले तालुक्यात प्रथम आली होती. सत्काराला उत्तर देतांना मला सी.ए. करण्याचा मनोदय असल्याचे कु. पूर्वा ने सांगितले.
मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज-अकोले चे उपप्राचार्य प्रा.दीपक जोंधळे, उप मुख्याध्यापक सुधीर जोशी यांनी पूर्वा ला पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरविला. त्याचबरोबर सौ. ज्योती, धनंजय व अजय जाजू यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.संपतराव वाळके, प्रा.सुरेख़ा भोसले, प्रा.प्रमिला फरगडे, लेखनिक ऋषभ शहा, प्रयोगशाळा सहाय्यक पराग सोमणी, विजय क्षिरसागर, तर अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने तालुकाध्यक्ष निरज मुंदडा, सचिव प्रसाद राठी, यांनी कु.पूर्वा चा सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष चेतन बुब, खजिनदार गौतम मुंदडा, संगठन मंत्री सर्वेश डांगरा, सह-सचिव अल्पेश सारडा, माजी सचिव विशाल राठी आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अजय व धनंजय जाजू यांनी मानले.
=======



