राजकारण

आमदार खताळ यांच्यावर टीका करण्याचाअधिकार नाही- गुलाबराजे भोसले

भाजप तालुका अध्यक्षांची सडकून टीका

संगमनेर प्रतिनिधी :


ज्यांना गेली 40 वर्षात संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील रस्त्यांसाठी निधी आणता आला नाही तसेच जि प माजी सभापतीं यांच्या स्वतःच्या गावातील रस्त्यांसाठीही आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून निधी मंजूर केला त्यांना साकुर पठार भागातील इतर रस्त्यांबाबत बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही अशी खरमरीत टीका भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी माजी सभापतींचे नाव न घेता केली
गुलाबराजे भोसले म्हणाले की गेल्या ४० वर्षांत साकुर ते बिरेवाडी आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात अपयश आले. मात्र आता आमदार अमोल खताळ पाटील यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून या भागातील रस्त्यांच्या कामासह विकासाला गती दिली ., साकुर ते बिरेवाडी यासह भागातील अनेक रस्ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच मंजूर केला असे तुम्ही म्हणत असाल तर, तर इतकी वर्षे हा रस्ता का झाला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला
ज्यांना स्थानिक आमदार विकास निधी व राज्य शासनाच्या निधीमधील फरक समजत नाही, त्यांनी या विषयावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. सभापती पदाच्या कार्यकाळात साकुर पठार भागातील बिरेवाडी ,बावपठार , वरवंडी यासह अनेक रस्त्यांची कामे तुम्हाला पूर्ण करता आली नाही . तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने हा पठार भाग विकासापासून वंचित ठेवला. महायुती सरकारच्या काळात सुरू असलेल्या विकास कामांचे खोटे श्रेय घेण्याचा तुम्ही आणि तुमचे नेते केविलवाना प्रयत्न करत आहे हे आता जनता ओळखून आहे. आत्तापर्यंत तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी एवढे नारळ फोडले तेवढ्या नारळाच्या पैशात रस्त्याचे कामे झाले असते हे जनतेला सांगावे. असाही सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे

आपल्या कार्यकाळात पठार भागात मंजूर झालेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे माजी सभापतींनी ते काम का पूर्ण झाले नाही याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि मगच पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर टीका करावी. असाही सवाल भोसले यांनी माजी सभापतींना विचारला


महायुती सरकारच्या माध्यमातून पठार भागाच्या नियोजनबद्ध आणि कालबद्ध विकास होत असताना काहींना हा विकास देखवत नाही मात्र आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यासह या पठार भागाच विकास आता कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला. खोटे श्रेय घेऊन सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना जनताच योग्य तो धडा शिकवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
भोसले म्हणाले की ज्यांचे स्वतःचे राजकीय भविष्यच आता उरलेले नाही, त्यांनी पठार भागाच्या भविष्याची चिंता करू नये. त्या भागाच्या विकासाची जबाबदारी आमदार अमोल खताळ पाटील हे समर्थपणे पार पाडत असल्याचे गुलाबराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button