ईगल एम्पॉवर सिक्युरिटी सर्व्हिसेस एजन्सी ला काळ्या यादीत टाका

ठाणे दि 7 जून,/महादर्पण प्रतिनिधी
ईगल एम्पॉवर सिक्युरिटी सर्व्हिसेस या एजन्सी च्या काळ्या कारभाराची चौकशी करून या सेवा कंपनीला काळा यादीत टाकावे अशी मागणी कामगार आयुक्तांकडे केली आहे
याबाबतची अधिक माहिती अशी की ईगल एम्पायर सिक्युरिटी सर्विसेस या एजन्सी मार्फत जळगाव,ठाणे,मुंबई, डोंबिवली या परिसरात सुरक्षारक्षक सेवा पुरवली जाते ही सेवा पुरवत असताना ग्रामीण भागातील गरजू, गरीब होतकरू नडलेल्या लोक हेरून या कंपनीत कामाला घेतले जाते कामाला घेताना कुठल्याही प्रकारची नेमणूक ऑर्डर / आदेश न देता तोंडी ऑर्डर देऊन गोरगरीब लोकांकडून काम करून घेतले जाते त्याची कुठलीही नोंद कंपनीच्या रेकॉर्डला न ठेवता परस्पर दुसऱ्याच व्यक्तींच्या नावे पगार काढले जातात आणि मूळ काम करणाऱ्याचे हातावर तुटपुंजा पगार दिला जातो कंपनी कायद्यानुसार कामगार पगार न देता तुटपुंजा पगार दिला जातो तोही वेळेवर दिला जात नाही कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते वर पी एफ न भरता बनावट पीएफ खाते दाखवले जाते बनावट नंबर वर पीएफ भरला जात असल्याचे भासवले जाते प्रत्यक्ष साइटवर काम करणाऱ्या कामगारांच्या नावाने पीएफ न भरता पी एफ भरल्याचे भासवले जाते कंपनीचा सर्वच कारभार अनागोंदी व संशया स्पद असल्याने या कंपनीची सखोल चौकशी करावी व
कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपनी /एजन्सी चालकावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आरपीआयचे नेते विजय पवार यांनी केली आहे कंपनीच्या या संपूर्ण कारभाराचा भांडाफोड करण्यासाठी आपण लवकरच कामगार मंत्री व राज्याचे कामगार आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले
सदर एजन्सी समर्पित सुरक्षा रक्षक आणि सर्वसमावेशक सुविधा व्यवस्थापन पुरवते. जळगाव, ठाणे आणि मुंबई यांसारख्या ठिकाणी कार्यरत असलेली ही संस्था, व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी गरजांसाठी कर्मचारी पुरवते .
बँका, कारखाने, कॉर्पोरेट कार्यालये आणि गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सुरक्षा रक्षक सेवा,२४-तास सुरक्षा कर्मचारी, व्यावसायिक संरक्षण, आणि बाउन्सर/कार्यक्रम सुरक्षा. सुविधा व्यवस्थापन सेवा पुरविण्याचे ठेका घेतला जातो
भडगाव( जळगाव) येथे मुख्य कार्यालय आहे तर मुंबई, ठाणे आणि डोंबिवली परिसरात या कंपनी कडून सुरक्षा सेवा सुविधा चे कामे सूरू आहेत
कामगार कायद्याला हरताळ पासून कामगारांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या एजन्सी /कंपनीकडून न्याय न मिळाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येणार असल्याचे श्री पवार यांनी सांगितले



