ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंगटे यांचा अमृत महोत्सवी सोहळा पाचवड येथे संपन्न

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव
विरमाडे ता. वाई. येथील ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंगटे यांचा अमृत महोत्सवी सोहळा नुकताच पाचवड येथील सह्याद्री हॉलमध्ये संपन्न झाला. त्यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली.
हा कार्यक्रम हिंदीचे गाढे अभ्यासक शौकत मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मा. सिनेट सदस्य,व वेणूताई चव्हाण कॉलेज कराड,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. रघुनाथ केंगार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रथमतः सत्कारमूर्तींची त्यांच्या पंधरा पुस्तकाच्या प्रतीनी तुला करण्यात आली. व त्यांच्या बायकोची धान्यतुला करण्यात आली. याप्रसंगी चिरंजिव प्रवीण, प्रदीप संदीप,प्रकाश शिंगटे, अमोल शेवते व त्यांच्या मित्रमंडळींचे सहकार्य लाभले. सुरेश शिंगटे यांचे बंधू रमेश शिंगटे यांचाही वाढदिवस एकत्र साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला यशवंत शिक्षण संस्था सुरूरच्या सर्व शाखेतील सेवानिवृत्त शिक्षक सहकारी,त्यांचे साहित्यिक मित्र, नातेवाईक उपस्थित होते. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी संतोष बरकडे,वाई यांच्यासारखे उच्चपदस्थ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ही उपस्थित होत्या.
याप्रसंगी सुरेश शिंगटे यांच्या’सावित्री कुमार’नावाने लिहिलेले 105 कवितांचा “ढवळलेले चांदणे” ह्या कवितासंग्रहाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन आले. तेव्हा आपल्या भाषणात मोकाशी सर म्हणाले, सावित्री कुमार शिंगटे यांचा “ढवळलेले चांदणे”हा काव्यसंग्रह नवरसानी ओथंबलेल्या कवितांनी भरलेला आहे.”
प्रा.डॉ.केंगार म्हणाले,” ढवळलेले चांदणे,”या काव्यसंग्रहातील कवितात निसर्गातील विविध रूपे, विषम समाजव्यवस्था,नवतारून्यातील प्रेम, स्त्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन, व्यक्तिविशेष, देव आणि दैव,अंधश्रद्धा व अटळ अशा मरणाचे दर्शन घडते.”.

शिंगटे यांचे मित्र सर्वश्री जहांगीर मुल्ला,लक्ष्मण ढेरे, प्रकाश कटवटे , अभिमन्यू पवार, एम एल गायकवाड,
महीपती राजपुरे,अंकुश गायकवाड ,रमेश कदम, सुनील बाबर, कृष्णा मोरे, विद्यार्थी मा.जि.प.सदस्य शशिकांत पवार. तसेच शिंगटे यांच्या साहित्यावर पीएचडी केलेले डॉ.माणिक बनकर व नातेवाईकांचीही गुणगौरवपर भाषणे झाली.
संपत कांबळे सर यांनी प्रास्ताविक केले.शिवाजी पवार सरांनी बहारदार असे सूत्रसंचालन केले.व आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.




