ग्रामीण

राजा हरिश्चंद्र विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत मोबाईल ॲप!

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव.


शेणित: दि.६ अकोले तालुक्यातील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी ,शेणित तालुका अकोले या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत मोबाईल ॲप देण्यात आले .

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परिवर्तन करावे. या दृष्टीने शेणीत गावचे सुपुत्र श्री राजेश साबळे यांनी श्री गुल अडवाणी रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर यांच्या माध्यमातून विदयालयातील इयत्ता दहावीच्या वीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक मोबाईल अॅप मोफत उपलब्ध करून दिले.

विद्यार्थी या अॅप द्वारे इंग्लिश, मराठी विषयाचा अभ्यास करणार आहेत. त्यामुळ बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुलभ होणार आहे. एका विद्यार्थ्यासाठी या ॲपची किंमत सुमारे 1500 रुपये इतकी आहे ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना ते पूर्णतः विनामूल्य देऊन श्री गुल आडवाणी यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले

दहावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणती शाखा निवडावी, कोणत्या शाखेत करिअर करायचे याबद्दल अतिशय चांगले मार्गदर्शन केले. त्यांच्या या स्तुत्य व उल्लेखनीय उपक्रमाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री मुरलीधर तळपे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुरलीधर तळपे, शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर, श्री घनशाम नवले, श्री तुकाराम बेणके, जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर भांगरे, महादर्पनचे प्रतिनीधी श्री संतु जाधव, श्री विजय बढे, श्री नारायण धोंगडे, श्री अशोक लांघी, श्री पोपट भांगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री घनशाम नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button