गडकरी कुटुंबीयांच्या मदतीतून उभी राहिली शेणित आश्रमशाळेत वसतिगृह !

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधवशोणित दि. १६
डॉ.राजेंद्रप्रसाद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शेणित येथे भारतीय स्वातंत्र्यदिनी विराज गडकरी कक्ष या नूतन विस्तारित इमारतीचे पंचशीलप्रभा गडकरी,अमृता गडकरी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शेणित सारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्याचे कार्य आश्रमशाळा अविरतपणे करत आहे.यादरम्यान आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.त्यामुळे निवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीची गरज लक्षात घेऊन गडकरी कुटूंबातील सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला.मा.विराज यांचे स्मरणार्थ प्रशस्त, सर्व सुविधायुक्त, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन इमारत विद्यार्थीनींकरीता उपलब्ध करून देण्यात आली आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडकरी कुटूंबातील सदस्य वैज्ञानिक श्री.दीपक गडकरी,सौ.ज्योती गडकरी,अमृता गडकरी, बंधू अशोक गडकरी,सौ.आरती गडकरी,संदीप गुप्ते,ठोसर, साठे, केदार रचादी,त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
उदघाटनप्रसंगी अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.डाॅ.किरण लहामटे ,सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मुठे एम.एल., कोषाध्यक्ष विवेक मदन ,सचिव कानवडे टी.एन.,मिलिंद उमराणी ,शेणित गावचे सरपंच गोविंद करवंदे,श्रीराम पन्हाळे,प्राचार्य येलमामे,विजय पवार,प्रा.नवले, अशोक मिस्त्री,संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, मान्यवर, सत्यनिकेतन संस्थेचे सर्व विद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य श्री.गभाले वाय.व्ही. सदरप्रसंगी आश्रमशाळेचे माजी प्राचार्य श्री.ज्ञानदेव आरोटे यांनी रुपये ५१,००० रकमेचा चेक देणगी म्हणून संस्थेकडे सुपूर्द केला.तसेच मा.अशोकजी गडकरी व आरती गडकरी यांचेकडून वसतिगृहासाठी घड्याळ व रुपये १०,००० रक्कम देणगी म्हणून देण्यात आली.मुलांचे आवडते रवीभाऊ यांनी सर्व विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे स्टेनलेस स्टील ग्लास भेट दिले.इयत्ता पहिली ते चौथी वर्गाकरिता Drawing kit, इयत्ता पाचवी ते बारावी करिता writing pads, ball pen आदी शैक्षणिक साहित्य पाहुण्यांनी भेट म्हणून विद्यार्थ्यांना दिले.
संस्थेचे सहसचिव श्री.उमराणी यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी डिक्शनरी खरेदी करण्यासाठी रुपये ५,००० रक्कम देऊन ज्ञानदानाचे काम केले.कार्यक्रमाची सांगता प्रसंगी मा.श्रीराम पन्हाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी गोड सुप्रसिद्ध राजूर कंदी पेढे वाटून मुलांचा आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री मुतडक एस. एन. यानी केले. मुख्याध्यापक श्री चौधरी बी. एस. यांनी उपस्थितांचे आभार मानले.



