इतर

वीर पत्नीच्या हस्ते ओम साई राम प्रतिष्ठान मंडळाच्या देखाव्याचे दिमाखात उद्घाटन

कोतुळ प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोतूळ नगरीचा राजा ओम साईराम प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याही वर्षी या मंडळांने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांच्या पत्नीच्या हस्ते जिवंत देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले
ब्राह्मणवाडा येथील शहीद जवान संदीप गायकर यांच्या वीर पत्नी दिपाली संदीप गायकर. वीर पत्नी मीना रामदास गीते, वीर पत्नी सविता केशव बोऱ्हाडे या समावेतच ज्येष्ठ पत्रकार हेमंत आवारी कोतुळ गावचे मा. उपसरपंच राजेंद्र नानासाहेब देशमुख,सचिन खरात, भाऊ दाजी प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र भाऊसाहेब देशमुख व कन्या शाळेची माजी मुख्याध्यापक शरद देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती होती
मागील वर्षी सुद्धा मंडळाने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या हस्ते देखाव्याची उद्घाटन केले होते.


कोतुळ नगरीचा राजा ओम साईराम प्रतिष्ठान गणपती मंडळाला यावर्षी 28 वर्षे पूर्ण झाले आहेत. याही वर्षी मंडळाने सामाजिक संदेशातून ” कचऱ्याचा डब्बा ” हा शेतकऱ्याच्या जीवनातील आत्महत्येच्या प्रश्नावर निगडित
तसेच महिलांच्या प्रश्नावर आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारावरील प्रश्नावर हा देखावा समाजाचे लक्ष वेधतो
मागील वर्षी मंडळाने ” मुलगा माझा साहेब झाला ” या समाजातील प्रश्नावरती जिवंत देखावा सादर केला होता संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये ओम साई राम मित्र मंडळाच्या देखाव्याला नागरिकांची पसंती असून भर पावसात देखील या देखाव्याला प्रचंड गर्दी जमत आहे
विशेष म्हणजे या देखाव्यातील सर्व पात्र स्थानिक मुले मुली आहेत
लिज्जत पापड चे मा.संचालक सुरेशराव कोते मंडळाचे मार्गदर्शक असून मंडळाच्या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button