श्री विशाल गणेश मंदिरात रामदास फुले यांच्या हस्ते महाआरती,

पावसासाठी घातले साकडे, हा माझ्या पस्तीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव -रामदास फुले
अहिल्यानगर -प्रतिनिधी :
अहिल्यानगर शहराचे आराध्यदैवत, दक्षिण नगरची शान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विशाल गणपती मंदिराचा गाभारा काल ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजराने दणाणून गेला. निमित्त होते नेप्तीचे सुपुत्र, नेप्ती सकल माळी समाजाचे अध्यक्ष, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा दमदार सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या हस्ते झालेली महाआरती. सकल माळी समाज ट्रस्ट व मंदिर ट्रस्टने आवर्जून आमंत्रित करून रामदास फुले यांना आरतीचा मान दिला. हा मान मिळताच फुले यांनी भावुक होत श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. तसेच पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून विहिरीने तळ गाठल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी सर्वांनी पाऊस पडावा यासाठी बाप्पाच्या चरणी साकडे घातले .
नगरच्या माळीवाडा बस स्टँडजवळील हे मंदिर म्हणजे एक स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे. जयपूरच्या बिर्ला मंदिराच्या धर्तीवर पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात हे मंदिर उभारले आहे. भव्य गणेश मूर्ती पाहताच क्षणी मन प्रसन्न होते. गणेशोत्सवात तर येथे भाविकांचा महासागर लोटतो. श्री विशाल गणेश मंदिरात आरतीचा मान मिळणे, हे माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नाही. हा माझ्या आजवरच्या सामाजिक कार्याचा गौरव आहे. मला हा मान दिल्याबद्दल मी सकल माळी समाज ट्रस्ट व मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त, पुजारी महाराज आणि सर्व नगरकरांचा शतशः आभारी आहे. बाप्पाने मला अशीच समाजसेवा करण्याची ताकद द्यावी, एवढेच मागणे मी बाप्पाच्या चरणी मागितले.
गेल्या अनेक वर्षांपासून रामदास फुले हे समता परिषदेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी लढत आहेत. शिक्षण, क्रीडा, स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. नुकत्याच नेप्तीत त्यांनी वेताळबाबा मित्र मंडळ व द किंग ग्रुप यांच्या मदतीने ३०० स्पर्धकांच्या भव्य क्रीडा स्पर्धा घेऊन महाराष्ट्रात नाव कमावले आहे. ऊन ,वारा , पाऊस , पैसा याचा विचार न करता गेली 35 वर्षापासून ते समाजातील गोरगरीब घटकासाठी झटत आहे. त्यांना आज पर्यंत खूप पुरस्कार भेटलेले आहेत पण हा मान ही खूप मोठा आहे. हा माझ्या 35 वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी केले.

या महाआरती सोहळ्याला मंदिराचे सर्व पदाधिकारी, सकल माळी समाज बांधव, समता परिषदेचे कार्यकर्ते, महिला मंडळ आणि शेकडो भाविक उपस्थित होते. आरतीनंतर मंदिर ट्रस्टने फुले यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. फुलांच्या उधळणीत संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. शेवटी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.



