इतर

कोतुळ ला कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी


कोतुळ प्रतिनिधी
कोतुळ, ता. अकोले : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोतुळ यांच्या वतीने गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी , कोतुळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रामहारी कातोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कैलास राऊत मामा, पत्रकार डॉ. विश्वासराव आरोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिल गुंजाळ होते.


विद्यालयाचे माजी विद्यार्थी उद्योजक श्री. कैलास राऊत मामा यांनी विद्यालयाच्या नूतन इमारत बांधकामासाठी १,११,१११/- देणगी जाहीर केली. तसेच श्री. सिताराम काशिनाथ देशमुख यांच्या कन्या यांच्याकडून विद्यालयासाठी १,००,०००/- व श्री. सयाजीराव गोपाळराव देशमुख यांच्या कन्या विद्यालयास भरीव देणगी देणार आहे.
यावेळी विद्यालयातील गुरुकुल प्रमुख श्री.गोरडे एस.पी. यांच्या पुढाकाराने श्री.जगे काका (ठाणे) यांनी विद्यालयातील गरीब, हुशार व होतकरू इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. दीक्षा कैलास दूधवडे हिस सायकल व शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी कौतुक केले..श्री गणेश निवृत्ती घोलप यांनी आईच्या स्मरणार्थ इयत्ता १० वी तील प्रथम,द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बक्षीस जाहीर केले.

श्री. सुरेशराव कोते यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तर प्रमुख वक्ते श्री. अनिल गुंजाळ यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी केलेल्या महान कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांवर अवलंबून न राहता संस्कार व कौशल्य आत्मसात करून जीवनात यशस्वी व्हावे, तसेच आई-वडील, गुरुजन आणि निसर्ग यांना आदर्श मानून त्यांचा मान-सन्मान करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला श्री. सीताराम देशमुख पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षणाच्या माध्यमातून जीवन घडविण्याचा संदेश दिला. विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. देशमुख भागवत यांनी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी माजी विद्यार्थी, पालक व समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
विद्यालयाचे प्राचार्य गोडे जे. बी. यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाची वाटचाल, नूतन इमारतीची गरज व भविष्यातील विकासकामांची माहिती दिली. तसेच नूतन इमारत बांधकामासाठी माजी विद्यार्थी, उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांनी भरीव आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमातील मान्यवरांचा परिचय व स्वागत पर्यवेक्षक शिंदे टी. डी. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खतेले सर, श्रीम.डुबे मॅडम व श्रीम.बोऱ्हाडे मॅडम यांनी केले. शेवटी श्री.कोंडार सर यांनी आभार प्रदर्शन केले.


कार्यक्रमास उद्योजक माणिकराव देशमुख अगस्तीचे संचालक मनोज देशमुख, श्री.मनोज कवडे जि प सदस्य .श्री.रमेश देशमुख,मा.श्री.अनिल द देशमुख,श्री.राजेंद्र पाटील देशमुख श्री,सयाजीराव देशमुख ,श्री.राधाकिसन गोडसे,.श्री.संजय काळे ,डॉ.सोपान कवडे,.सौ.सुनंदा देशमुख,श्री.राजेंद्र आरोटे,श्री.शंकर घोलप,श्री संजय उकिरडे श्री.दिपक राऊत ,श्री.गणपत भोर ,भाऊसाहेब देशमुख ,श्री.सुनिल आरोटे,श्री.अनिकेत सोनुले,श्री.राहुल खरात,चेतन जाधव तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button