इतर

व्ही. व्ही. पोपेरे यांना ‘महात्मा गांधी शांती सद्भावना राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान.


प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव
दि.08/10/2026

‘व्हिजन इंडिया भारत’ या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात आदिवासी सेवक डि.लीट डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल ‘महात्मा गांधी शांती सद्भावना राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेली ‘व्हिजन इंडिया भारत’ ही संस्था भारत व इतर ९ देशांमध्ये सामाजिक, लोकोपयोगी आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबवत आहे.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी कमांडर व्ही. के. जेटली (नवी दिल्ली), पॅरा कमांडो शौर्यचक्र विजेते मधुसूदन सुर्वे, २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान शौर्य गाजवणारे मंगेश नाईक आणि यु.के. शिक्षण सहसंचालिका नेहा ठाकूर उपस्थित होत्या.

‘व्हिजन इंडिया भारत’चे अध्यक्ष स्वप्निल वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.
डॉ. पोपेरे यांनी आदिवासी भागात आणि समाजकार्यात बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

यापूर्वी डॉ. पोपेरे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्रीलंका देशाचे राष्ट्रपती आणि नेपाळच्या पंतप्रधानांच्या हस्तेही त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.
या सोहळ्याला जगातील ९ देशांतील तसेच भारतातील विविध राज्यांतील सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button