मान्हेरे केंद्रात शिक्षकांचे मूल्यवर्धन शिक्षक उजळणी प्रशिक्षण संपन्न .

प्रतिनिधी /श्री एस. के. जाधव
मान्हेरे दिनांक :९
मान्हेरे केंद्रातील जि. प. प्राथमीक शाळा वाकी येथे विशेष शिक्षण परिषदेत शिक्षकांचे मूल्यवर्धन शिक्षक उजळणी प्रशिक्षण संपन्न झाले.
मान्हेरे केंद्राचे केंद्र समन्वयक श्री राम ओहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मूल्यवर्धन प्रशिक्षण देण्यात आले.
सुलभक श्री गिरीधर सारूक्ते सरांनी शिक्षकांना संबोधित करताना म्हणाले,” शिक्षणातून विवेक, आचरण असणारा सहानुभूती ठेवणारा धीट आणि प्रसंगी सावरण्याची लवचिकता असणारा सर्जनशील आणि मूल्यांची नाळ घट्ट जोडलेला माणूस घडावा. हे ध्येय गाठण्यासाठी मानवी आणि संवैधानिक मूल्यांची रुजवणूक करणे , संवाद,सांघिक कार्य आणि कोणत्याही स्थितीत लवकर सावरण्याची लवचिकता ही जीवन कौशल्य विकसित करणे , सामाजिक, नैतिक व भावनिक कौशल्य आणि स्वभाव गुण असलेला माणूस घडवणे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही उपक्रमांची बांधणी करावी लागते. मूल्य,उद्दिष्टे, अध्ययन निष्पत्ती, उपक्रम,ध्येय हे सारे विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार बदलत गेलेले आहेत. प्रशिक्षण कशासाठी असावे ? उपक्रम कसे घ्यावेत? उपक्रमात कोणते मुद्दे असावेत ? विस्मरण कशाचे होते? या प्रश्नांच्या उत्तरासाठी गटकार्य घेण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षातील मूल्यवर्धनाची सहा लक्ष या घटकावर आधारित गटकार्य देण्यात आले आणि प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी दहा मिनिट वेळ देण्यात आला . गट क्रमांक दोन मधील श्री देवराम बांडे, श्री संतु जाधव यांच्या गटाने उत्कृष्ट सादरीकरण केले.

मूल्यवर्धनाची रचना टप्प्यानुसार असल्याने उपक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत राबवणे बंधनकारक असते. एखादा उपक्रम मध्येच बंद करू नये. मूल्यवर्धन उपक्रमातील मूल्य,क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती समान असून वर्ग रचनेनुसार असते.दहा मूल्यांवर आधारित उपक्रम घ्यायचे असतात.उपक्रम निवडताना विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घ्यावा. आठवड्यातून दोन उपक्रम घ्यावेत आणि त्या उपक्रमाचे टप्पे सुस्पष्ट असावेत.
दुसरे सुलभक श्री पांडुरंग खाडे सरांनी सांगितले,” लहान मुलांमध्ये या उपक्रमांच्या माध्यमातून मूल्यांची रुजवणूक करायची आहे उदाहरणार्थ रस्त्यात केळीची साल पडलेली आहे ते उचलून टाकण्यास सांगणे. आजी-आजोबा यांच्याकडे जड बाजाराची पिशवी असेल तर त्यांना मदत करणे. लहान मुलाला रस्ता ओलांडण्यात मदत करणे तसेच रस्त्यात काटे पडले असतील तर ते उचलून टाकण्यास सांगणे या अगदी साध्या गोष्टी आहेत हेच मूल्य आपण शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचे आहेत. शिक्षकांना कामाचा व्याप खूप वाढलेला आहे परंतु तरीसुद्धा मूल्य आणि उपक्रमासाठी आठवड्यातून दोन तासिका दिले आहेत.
समाजात गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे, आपण प्रयत्न केले तर ही मुले या नकारात्मक गोष्टींकडे वळणार नाहीत पुढे आदर्श नागरिक घडतील यासाठी शासनाने दखल घेऊन हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे.मुलांमध्ये चांगले संस्कार, मूल्य रुजविण्यात आपण यशस्वी झालो तर भविष्यात गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी झालेले दिसेल. त्यासाठी सर्व शिक्षकांनी मनापासून काम केले तर ही मुले आदर्श नागरिक घडतील. ही सारी जबाबदारी शिक्षकांची आहे हे पवित्र काम एकजुटीने आणि सर्वांनी मिळून करायचे आहे.” मूल्यवर्धनाची सहा लक्ष या घटकावर आधारित सखोल आणि सविस्तर माहिती दिली. प्रत्येक शिक्षकाने आणि शाळेने अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

कार्यक्रमाचे प्रमुख श्री राम ओहोळ यांनी शेवटी सर्वच उपस्थिताना मूल्यवर्धनाचे महत्त्व व घ्यावयाचे उपक्रम यांचे महत्त्व पटवून दिले. मूल्यवर्धन आणि अध्ययन-अध्यापन पद्धतीवर होणारा त्याचा परिणाम परिवर्तन घडवून आणणारा आहे. त्याचबरोबर एस. एन. ए. स्पर्श कार्यशाळे संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी श्री नानासाहेब नाडेकर, श्री रमाकांत भागडे, श्री गणपत उघडे, श्री भिमा कोकतरे, श्री अर्जुन तळपाडे, श्रीमती यशोदा ढगे, श्री हेमंत मुठे, श्री सोमनाथ धिंदळे, श्री लक्ष्मण मुठे, श्री तुकाराम मधे, श्री दिपक साळवे, श्री रामनाथ मुठे, श्री राजेंद्र देशमुख, श्री देवराम बांडे, श्री अर्जुन बांबेरे, श्री सुधाकर भांगरे, श्री विठ्ठल कवटे, श्री रघुनाथ वायळ, श्री दशरथ सोंगाळ, श्री अर्जुन भांगरे, श्री युवराज तळपे, श्री राघु भांगरे, श्री तुकाराम बेणके, श्री घनशाम नवले, श्री युवराज गभाले, श्री भगवान लोटे, श्रीमती इंदिरा सगभोर, श्रीमती माधुरी बोरसे, श्री दिलीप खरात, श्री दिलिप होलगीर, श्री सुरेश पवार, श्रीमती सविता शिंदे, श्रीमती रोहीणी नवाळी, श्रीमती मनिषा आवारी, महादर्पनचे प्रतिनिधी श्री संतु जाधव आदि शिक्षक उपस्थित होते.
मान्हेरे केंद्राचे केंद्रसमन्वयक श्री राम ओहळ यांनी उपस्थित शिक्षकांचे आभार मानले.



