इतर

श्रीमती सोनार यांना राज्यस्तरीय आयडाॅल शिक्षक पुरस्कार जाहीर

इगतपुरी – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत सन २०२६-२७ अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा राज्य आयडाॅल शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद दरेवाडी शाळेच्या उपक्रमशील गुणवंत शिक्षिका श्रीमती वंदना सोनार यांना जाहीर करण्यात आला आहे.

त्यांच्या या कौतुकास्पद व उल्लेखनीय यशाबद्दल इगतपुरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंढे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मंजुषा साळुंखे, काळुस्ते केंद्राचे केंद्र समन्वयक निशांत पगार, मुख्याध्यापक संजय गातवे, सहशिक्षक महेश खैरनार व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईनाथ गावंडा यांनी त्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे.

यापूर्वीही श्रीमती सोनार यांना विनोबा स्टार टीचर ॲवार्ड, नाशिक जिल्हा परिषदेचा दीपस्तंभ शिक्षक पुरस्कार व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बाबत प्रशंसनीय यशाबद्दल त्यांचे व दरेवाडी शाळेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button