आश्रम शाळा विद्यार्थ्यांसाठी जेई, निट प्रवेश चाळणी परीक्षा संपन्न..!

अकोले प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर अंतर्गत शासकीय व निमशासकीय आश्रमशाळेतील एस.एस.सी.परीक्षा मार्च- 2026 मध्ये उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करण्यासाठी आदि.विकास विभागामार्फत दर वर्षी विभागीय पातळीवर चाळणी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते.
या परीक्षाव्दारे प्रत्येक विभागातील साठ-साठ विद्यार्थ्यांची निवड करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च आदिवासी विकास विभागामार्फत उचलला जात असुन महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करीअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.यासाठीची सन 2026 ची चाळणी प्रवेश परीक्षा
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सावरचोळ ता. संगमनेर जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली होती.
जेई परीक्षेसाठी 158 विद्यार्थी 133 निट परीक्षेसाठी १64 विद्यार्थी पात्र होते, असे एकुण राजुर प्रकल्प अंतर्गत सावरचोळ केंद्रावर 322 विद्यार्थी चाळणी परीक्षेसाठी पात्र होते. एकूण जेई व निट परीक्षांसाठी 133 तर निट परीक्षेसाठी122 असे एकूण 255 विद्यार्थी उपस्थित होते. सदर परीक्षेचे एकुण १४ परीक्षाव्हाॅलमध्ये विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांना भोजन, पिण्याचे स्वच्छ पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. परीक्षा दरम्यान अपर आयुक्त कार्यालय नाशिक येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.एस.डी.सुडके यांनी भेट दिली.

सदर परीक्षा पार पाडण्यासाठी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. दिपक कालेकर,आंबादास बागुल, श्री. शिवराज कदम यांनी केंद्र प्रमुख,तर आदिनाथ सुतार यांनी परीक्षा विभाग प्रमुख व नवनाथ गायकवाड यांनी केंद्र समन्वय म्हणून कामकाज पाहिले व परीक्षेसाठी श्री.कुलदिप पाटील,श्री.घाडगे डी.बी.,गजरे एस.आर. यांनी सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले.


