सामाजिक समतेसाठी सर्वांनी एकत्र यावे — मंत्री ना. छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांची अहिल्यानगर ला भेट
शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे
अहिल्यानगर प्रतिनिधी –
एका कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे अन्न , नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अहिल्यानगर येथे भेट दिली
त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले याप्रसंगी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता परिषदेचे नेते रामदास फुले,,यांनी दोन्ही मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नामदार छगन भुजबळ यांनी सामाजिक एकात्मता, शिक्षण आणि सर्वसमावेशक विकास यावर विशेष भर दिला. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजनांद्वारे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेत समाजहितासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परंपरेचा उल्लेख करत समता, बंधुता आणि लोकशाही मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विविध समाजघटकांना एकत्र घेऊन विकास साधणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक संघटनांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमा दरम्यान विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी छगन भुजबळ यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांच्या नेतृत्वाविषयी विश्वास व्यक्त केला. कार्यक्रम शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते नागेश गवळी, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, नंदनवन उद्योग समूहाचे दत्ता जाधव ,समता परिषदेचे नेते रामदास फुले, सुखकर्ता लॉन चे संचालक भाऊसाहेब होळकर,भरत गारुडकर, प्रसाद भडके, कार्याध्यक्ष अभिषेक चिपाडे, समता परिषदेचे महानगर जिल्हा अध्यक्ष ब्रिजेश ताठे, माजी सभापती सुवर्णा जाधव ,नंदनवन उद्योग समूहाचे बाबासाहेब जाधव ,संजय जाधव ,आदेश जाधव , नेप्तीचे माजी सरपंच अंबादास पुंड, केळ पिंपळगावचे सरपंच सचिन दळवी, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, प्रा. भाऊसाहेब पुंड, अशोक गवळी, भरत बोडके, भानुदास फुले व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी संयोजकाच्या वतीने उपस्थित त्यांचे आभार मानण्यात आले. अहिल्या नगर शहरात झालेल्या भुजबळांच्या या एंट्रीने मात्र राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली भुजबळांची जिल्ह्यातील आगामी राजकीय बांधणी बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली .



