अकोल्यात आंबेडकरांचा फोटो असणाऱ्या फ्लेक्स ची विटंबना, कार्यकर्त्यांनी टायर जाळून केला निषेध

अकोले प्रतिनिधी
अकोले शहरात डॉ आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असणाऱ्या फ्लेक्स ची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात टायर जाळून निषेध केला
: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरची विटंबना करून सदर बॅनर काढून टाकणाऱ्या अकोले बस स्थानकातील प्रशासनाचा आज अकोले येथे कोल्हार -घोटी रोडवर
आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली
आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून जाहीर निषेध करण्यात आला
विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा निमित्ताने अकोले बस स्थानक परिसरात लावलेल्या फ्लेक्स बोर्डची विटंबना केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत अकोल्यात निषेध केला

धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमीच्या निमित्ताने अकोले बस स्थानक परिसरात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काल फ्लेक्स बोर्ड लावला होता हा बोर्ड एसटी आगार प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकत फ्लॅटचे विटंबना केली यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले
रमेश श्रीकांडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे , विजय पवार प्रवीण देठे, संतोष देठे, संतोष गायकवाड, सचिन खरात, शशी सरोदे,आदी कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून एसटी प्रशासनाच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे


