ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

विलास तुपे
राजूर : राजूर येथील ॲड.एम.एन.देशमुख कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि.१६ व १७ फेब्रुवारी रोजी कै. होनाजी तुकाराम कोंडार स्मृतीचषक वादविवाद व कै. डॉ. माधवराव दिगंबर उमराणी स्मृतीचषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा.डॉ.किरण उमराणी व प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा कै.होनाजी तुकाराम कोंडार स्मृती सांघिक चषक अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब झरूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या कु .निलेश क्षिरसागर व करिष्मा मधे या विजेत्या संघाला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा कै.माधवराव दिगंबर उमराणी स्मृती चषक कोपरगावच्या के. बी. रोहमारे कनिष्ठ महविद्यालयातील कु. स्नेहल त्रिभुवन व रामेश्वर निंबाळकर या विजेत्या संघाला प्रदान करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमात वादविवाद स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रु.३००१) प्रतिक जाधव, संगमनेर महाविद्यालय संगमनेर, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक (रु.२५०१) श्रध्दा शिंदे, ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालय राजूर, तृतीय क्रमांक पारितोषिक (रु.२००१) निलेश क्षिरसागर व उत्तेजनार्थ (रु.७०१) करिष्मा मधे, अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले आणि उत्तेजनार्थ पारितोषिके (रु.७०१) स्नेहल बनसोडे,ॲड.एम. एन.देशमुख महाविद्यालय, राजूर तर वक्तृत्व स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रू.३००१) संध्या गिधाड, पी. व्ही. पी. कॉलेज प्रवरानगर, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक (रू.२५०१) संचित गायकवाड, एच. पी. टी. कॉलेज नाशिक, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक (रू.२००१) स्नेहल त्रिभुवन व उत्तेजनार्थ (रु ७०१) रामेश्वर निंबाळकर, के. बी. रोहमारे कनिष्ठ महविद्यालय कोपरगाव आणि उत्तेजनार्थ (रु.७०१) मयुरी कानवडे, अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महावि्यालय अकोले या विद्यार्थ्यांना देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक मा. संतराम बारवकर व प्रा. बबन थोरात यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.

सदर स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचलन वादविवाद वक्तृत्व मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. पंढरीनाथ करंडे यांनी केले. स्पर्धा संयोजनासाठी प्रा. ए. डी. सातपुते, प्रा. डॉ. बी. टी. शेणकर, प्रा. डॉ. व्ही. एन. गिते, प्रा. बी. एच. तेलोरे, प्रा. डॉ. एल. एल. वाळे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.