पाचुंदे सेवा संस्थेत जय हनुमान पॅनल चा दणदणीत विजय !

दत्तात्रय शिंदे
माका /प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील पाचुंदे
विकास सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत,जयहनुमान पॅनलने बाजी मारत दणदणीत विजय मिळविला
इतर मागास वर्ग व भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघा च्या जागांवर देवीदास वाघमारे,भाऊसाहेब होडगर
यांची बिनविरोध निवड झाली होती त्यानंतर 11 जागांसाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीत
जय हनुमान मंडळाचे उमेदवार,डॉ.अनिल होंडे, चंद्रकांत वैरागर, भरत होंडे,माणीक होंडे,उस्मान सय्यद,आदिनाथ होंडे, नारायण वाघमोडे,एकनाथ होंडे,आबाजी कोकरे,उषाताई होंडे,शांताबाई होंडे, हे विजयी झाले तर
विरोधी विठ्ठल अटक ,एकनाथ एरंडे, बाबाजी कोकरे ,भाऊसाहेब खरात, राजू खरात ,भानुदास चोपडे, अशोक टकले ,रखमाजी माने, संतराम माने ,शहाजी पठारे, अनिता माने, विजया माने यांचा या निवडणुकीत पराभव झाला
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी सी देवळालीकर यांनी तर सह्यायक म्हणून सचिव भाऊसाहेब होंडे यांनी काम पाहिले