इतर

डॉ. एपीजे अब्दुल कलामयांच्या जयंतीनिमित्तअकोले तालुक्याचे सुपुत्र बाळासाहेब बुळे यांचा सन्मान!

अकोले प्रतिनिधी

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे सुपुत्र बाळासाहेब बुळे यांचा नुकताच दिल्लीत सन्मान करण्यात आला

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या फॅमिली कडून अकोले तालुक्याचे सुपुत्र बाळासाहेब बुळे यांना सन्मानित करण्यात आले

यावेळी डॉ कलाम यांचेनातू डॉ. ए पी जे एम जे शेईक सलीम ( Dr. Apjmj sheik Saleem )रामेश्वरम यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला श्री बाळासाहेब बुळे हे दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे सेवारत असून नोकरी करत असताना समाजासाठी वेळ देऊन सामाजिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असतात त्यांच्या या कार्याबद्दल डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त दिल्ली या ठिकाणी सन्मानित केले

यावेळी डॉ एस एस अग्रवाल जनरल गुरुग्राम चे संचालक (Dr. S S Agrawal director general gurugram,) डी आर डी ओ चे शास्त्रज्ञ डॉ डिलिबाउ ( Dr. Dillibabu scientist DRDO,) एपीजे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाउंडेशनचे डॉक्टर नजीम माराकायर (Dr Nazem Marakayar APJ Abdul Kalam international foundation, ) महाराष्ट्राच्या मा.मंत्री ना. रक्षा खडसे( minister of state Maharashtra Raksha khadse)
आदी मान्यवर उपस्थित होते

अकोले तालुक्या सारख्या आदिवासी भागातीलश्री बाळा सा हेब बुळे यांच्या कामाची दिल्लीत दखल घेऊन देशाचे थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून दखल घेत बाळासाहेब बुळे यांचा सन्मान झाल्याने अकोले तालुक्यात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button