इतर

आपण कितीही मोठे झालो,तरीही ‘मातृभाषा’ विसरु नये’ – ॲड. क्यातम

.

पद्मशाली सखी संघमच्या तर्फे
तेलुगु भाषा दिन साजरा..

सोलापूर : भारताच्या लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ असा नव्हे, दुस-यांचे अपमान करणे. म्हणून, प्रत्येकाने इतर सर्व भाषांचेही सन्मान राखलेच पाहिजे. तेलुगु भाषाचे जन्म कधी झाले आजच्या परिस्थितीत कोणीही सांगू शकत नाही. पाच भाषा मिळून एक झालेला संस्कृत भाषा म्हणजेच तेलुगु. त्यामध्ये प्रथम म्हणजे ‘तेलुगु भाषा’ होय. मातृभाषा तेलुगु असले तरी व्यवहाराच्या दृष्टीने अन्य भाषेचे ज्ञान असणे महत्वाचे आहे.

तेलुगुमध्ये म्हटले जाते, ‘तेने कन्टे मधुरमैना तेलुगु भाषा’. अर्थातच, ‘तेलुगु भाषा मधाहूनही गोड’. म्हणून विसरु नयेत. सोलापूरातील पूर्व भागात तेलुगु भाषिक, सध्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून, तेलुगु मधून संवाद करण्याचे बंदच केले आहेत. किमान घरात असताना तेलुगु भाषेतून संवाद साधावेत, अत्यंत ज्वलंत प्रश्न म्हणजे, सोलापूरातील जुन्या पिढीच्या अनेक लोकांना वाचता येत नाही, बोलता येतो. सध्याच्या लहान मुलांना तेलुगु भाषा कळतोय पण, वाचता – बोलता येत नाही. भविष्यात हीच परिस्थिती राहिले तर, सोलापूरच्या पूर्व भागात पूर्वी तेलुगु भाषिक असायचे. असे म्हणण्याची वेळ येऊ नये. कारण, तिसरी पिढी संपण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत तेलुगु भाषिक असूनही तेलुगु भाषा बोलता येत नाही. म्हणून, प्रत्येकांने मातृभाषेचा अभिमान बाळगावा.

जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या बोली भाषा म्हणून ‘तेलुगु भाषा’ कडे पाहिले जाते. याचबरोबर जगातील कानाकोप-यात तेलुगु भाषिक आढळून येतात. याबद्दल अभिमान वाटतो. म्हणून, आपण कितीही मोठे झालो तरीही मातृभाषा विसरु नये असे आवाहन, प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम यांनी केले.

गुरुवारी संध्याकाळी दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने तेलुगु भाषा दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ॲड. क्यातम बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मेघा इट्टम, संस्थापक गौरीशंकर कोंडा, कला महाविद्यालयाचे अध्यक्ष श्रीनिवास यनगंदूल, फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. क्यातम हे सुरवातीपासून तेलुगु भाषेतूनच संवाद साधले, हे विशेष. ते पुढे म्हणाले, तेलुगु कवी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तेलुगु भाषेचे जनक असलेल्या ‘गिडगू वेंकट रामामूर्ती’ यांचे जन्मदिन २९ ऑगस्ट रोजी रोजी असून त्यांच्या सन्मानार्थ ‘तेलुगु भाषा दिन’ म्हणून आंध्रप्रदेश राज्य संयुक्त असताना त्यावेळच्या आंध्रप्रदेश सरकारने १९६६ साली पहिल्यांदा साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दरवर्षी कवी गिडगू वेंकट रामामूर्ती यांच्या जन्मदिनी ‘तेलुगु भाषा दिन’ साजरा केला जात आहे.

तेलुगु भाषा ही जगातील सर्वात जुनी व सर्वाधिक बोलणारी भाषा म्हणून पाहिले जाते. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांची अधिकृत भाषा सुध्दा आहे. तेलुगु भाषेला फार पूर्वी म्हणजे, अंदाजे ११ व्या शतकापासून परंपरा आहे ‘तेलुगु भाषा’ जगातील जुनी व द्रविड भाषांपैकी एक आहे. त्याचे प्रचार, भाषेत सुधारणा करण्यासाठी ‘गिडगू वेंकट राममूर्ती’ यांनी स्वतःचे आयुष्य वेचले होते. त्यांच्याच जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी ‘तेलुगु भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

यावेळी उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, समन्वयिका सुनिता क्यामा (निलम), वनिता सुरम, पल्लवी संगा, हेमा मैलारी, सुप्रिया मासम, सुलोचना माचरला, लक्ष्मी यनगंदूल, मंजुळा दुधगंडी, श्रावणी कनकट्टी, संगीता सिद्राल यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, वम्सी पल्ली आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ : सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, पद्मशाली सखी संघमच्या वतीने तेलुगु भाषा दिनानिमित्त आयोजन केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम. समोर उपस्थित महिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button