कान्हूर पठार येथे सिंचन योजना सर्वेक्षणाचा शुभारंभ; व वडगाव दर्या पर्यटन स्थळ विकास कामांचे लोकार्पण

पाण्याचा संघर्ष हा शरद पवार विरुद्ध कै. बाळासाहेब विखे माजी खासदार सुजय विखे
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
कान्हूर पठार भागाला पाणी मिळाले नाही कारण या पाण्याचा प्रत्येक नारळ पश्चिम भागातल्या मंत्र्यांने फोडले ही या मधली वास्तविकता आहे. मी काय कोणावर टीका करत नाही त्या खोलात मला जायचे नाही परंतु हा पाण्याचा संघर्ष पश्चिम विरुद्ध अहिल्यानगर आहे, हा संघर्ष पुण्या विरुद्ध नगर आहे, हा संघर्ष दुर्दैवाने मी कोणा परिवाराचे नाव घेऊ शकत नाही परंतु हा संघर्ष शरद पवार साहेब विरुद्ध कै. बाळासाहेब विखे पाटील आहे. हा संघर्ष आहे त्यामुळेच पठार भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याने अहिल्यानगरला पाणी येऊ दिले नाही ही खरी या कुकडी कालव्याची वास्तविकता आहे. अहिल्यानगर सुजलम सुफलम होऊ नये ही संकल्पना पुणे जिल्ह्यातील लोकांची होती म्हणून अहिल्यानगर पाण्यापासून वंचित राहिलं ही वास्तविकता आहे. असे स्पष्ट व बेधडक मत माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले.

पारनेर तालुक्याच्या पठार भागावरील वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी एकूण निधी नऊ कोटी व सध्या प्राप्त निधी 1.80 कोटी या विकास कामांचे भव्य लोकार्पण सोहळा तसेच महाराष्ट्र शासन व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कान्हूर पठार येथे दिलेल्या आश्वासनानुसार पारनेरच्या आवर्षणग्रस्त भागाला सिंचनाचे पाणी देण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाचा शुभारंभ तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 योजनेअंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजन या विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन समारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील तसेच भाजप अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग व पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य पठार भागाचे नेते विश्वनाथ कोरडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार सुजय विखे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले पुणे जिल्ह्याशी लढाईचं असेल तर ती धमक फक्त विखे कुटुंबा मध्येच आहे. जी लोकं नांगर टाकतात तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं त्यांचा आवाज निघू शकत नाही. त्यांचा खर्चपाणी तिथून चालतोय ते तुम्हाला काय पाणी देणार ज्यांचं अस्तित्व या पुणे जिल्ह्यामुळे आहे ते तुम्हाला काय पाणी देणार ते तुमच्या मुलांना भविष्य देऊ शकतात का हा विचार तुम्ही केला पाहिजे येणाऱ्या काळात तुम्ही तो विचार करावा एवढीच माफक अपेक्षा आशी परखड टीका खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता केली.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, शिवाजी खिलारी,
राजाराम एरंडे, वसंत चेडे, सचिन वराळ,माजी सभापती गणेश शेळके, नगरसेवक युवराज पठारे, दत्तात्रय रोकडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, राजेंद्र शेळके, दादाभाऊ सोनावळे, सुभाष दुधाडे, किसनराव शिंदे, भाजप महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, सुधामती कवाद, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष सुषमा रावडे, युवती तालुका अध्यक्ष अपर्णा खामकर, सागर मैड, दत्तानाना पवार, दिनेश बाबर, सरपंच लहू भालेकर, चेअरमन शिवाजी रोकडे, अब्बास मुजावर, वसंत शिंदे, अर्जुन नवले, सखाराम ठुबे, भरत ठुबे, बबन व्यवाहारे, सुशांत ठुबे, गणेश ठुबे, कानिफ ठुबे, गोकुळ ठुबे, आदी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी पठार भागावरील कार्यकर्ते, कान्हूर पठार येथील ग्रामस्थ, विश्वनाथ कोरडे युवा मंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्यांना तुम्ही निवडून दिले त्यांचा पाणी प्रश्नावर अभ्यास होता का एकदा विचारून पहा राजकारणामध्ये हुशार होणं फार चुकीचं आहे लोकसभेला पराभव झाल्यानंतर मी स्वतःला एकच प्रश्न विचारला की आपण उगाच डिगऱ्या घेतल्या लोक अशीच डॉक्टर होऊन गेले काय कराव बारा वर्षे शिक्षण घेतलं तेव्हा डिग्री मिळाली इथे एका महिन्यात डिग्री हे फक्त पारनेर तालुक्यात होऊ शकतं हीकला मला सहा महिन्यात शिकायला मिळाली.
टिंगल करणारी लोक सुजय विखे माजी खासदार झाल्याने हसत होते. पण तुम्हाला काय मिळाले तर सिस्पेसारखा घोटाळा मिळाला तुम्ही माझ्यावर हसा परंतु पारनेर तालुक्यातील जनतेचे पैसे सिस्पे मध्ये गुंतले त्याचे उत्तर कोण देणार असा प्रश्नच खासदार निलेश लंके यांना जाहीर सभेतून नाव न घेता सुजय विखे यांनी विचारला आहे.
पारनेर तालुक्याच्या पठार भागाचा पाणी प्रश्न फक्त जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटीलच सोडवू शकतात त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे पठार-भागावरील शेतकरी कष्टकरी जनतेच्या हिताचा प्रश्न आता सुटणार आहे.
आमदार काशिनाथ दाते
निवडणुकीचे तिकीट नको; पाण्याच्या कामाच्या प्रमा द्या ; विश्वनाथ कोरडे
पठार भागाच्या पाणी प्रश्नावर बोलताना भाजप प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले की मला निवडणुकीमध्ये तिकीट नको माझ्या पठार भागावरील जनतेला पाणी द्या व त्या पाण्याच्या कामाच्या प्रमा माझ्या हातात द्या मी राजकारण फक्त विकास कामांसाठी करतो आहेत मी आज पर्यंत पारनेर तालुक्यात अनेक पाण्याचे प्रश्न सोडवले असून जटिल प्रश्न सोडवण्यामध्येच मला रस आहे त्यामुळे पठार वाघाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी आता मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांना सोडणार नाही त्यांच्याकडून पठार भागाला पाणीच मिळवून घेणार आहे.



