इतर

अबॅकस कौशल्य शिक्षण घेणे ही आजची गरज: – संगीता फासाटे- कटारे


श्रीरामपूर(वार्ताहर) श्रीराम अबॅकस क्लासमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून अबॅकस शिक्षण घेणे ही आजच्या युगाची गरज असल्याचे मत शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका,कवयित्री संगीता चंद्रभान फासाटे -कटारे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील बोरावकेनगरच्या अक्षरवेलमधील श्रीराम अबॅकस क्लासमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री संगीता फासाटे- कटारे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये होते. श्रीराम अबॅकस क्लास संचालिका प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे यांनी स्वागत करून पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी श्रीराम अबॅकस क्लासची गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक पालक सौ. सोनाली दीपक कदम, सौ. कल्पना चंद्रकांत भोये, सौ. भारती अरुण तुपे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कवयित्री संगीता फासाटे- कटारे यांनी श्रीराम अबॅकस क्लासच्या संचालिका प्रा.सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली अबॅकसचे शिक्षण प्रभावीपणे होत असल्यामुळे या क्लासचे विद्यार्थी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. या क्लासच्या गुणवत्तेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, हे शिक्षण विद्यार्थ्याला बौध्दिकदृष्ट्या संगणकस्वरूपी गतीचे बनवितात, ते तांत्रिक गुणवत्तेच्या अनुषंगाने समजून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

पारितोषिक प्राप्त विद्यार्थी
याप्रसंगी प्रा. सौं. पल्लवी सेंदोरे यांनी गुणवत्ताधारक विद्यार्थांची यादी जाहीर केली.

लेव्हल 1 –
रँक 1 राजदीप दीपक कदम- ट्रॉफी,मेडल, सर्टिफिकेट
रँक 2- अर्पित जगन्नाथ जगताप – मेडल, सर्टिफिकेट
उत्तेजनार्थ – अंकित जगन्नाथ जगताप – मेडल, सर्टिफिकेट
लेव्हल 2 –
रँक 1 – आराध्या नंदकुमार सेंदोरे – ट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट
रँक 2- चैतन्य चंद्रकांत भोये – ट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट
उत्तेजनार्थ – श्रावणी अरुण तुपे आणि जान्हवी अशोक माहूरे – मेडल व सर्टिफिकेट
सहभागी – देवयानी दीनानाथ धनवडे – सर्टिफिकेट
तसेच

आराध्या आणि श्रावणी यांची Excellent Olympiad advanced level परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे कॅलिबेल्सची इको फ्रेंडली बॅग आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अध्यक्षीय भाषणातून अबॅकस शिक्षणाची गरज आणि स्पर्धा परीक्षेचे आवाहन याविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे यांनी केले. यावेळी श्रीमती चंद्रकला सैंदोरे, कु. ताराताई सैंदोरे यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. कृष्णा सैंदोरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button