श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या अध्यक्ष पदी बबनराव लंके यांची निवड करण्याची सभासदांची मागणी योग्यच .उद्योजक शिवाजीराव लंके .
पारनेर – राज्यात सर्व दूर प्रसिद्ध असलेली व नवसाला पावणारी श्री मळगंगा देवीच्या श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या कार्याध्यक्ष पदी कन्हैय्या उद्योग समुहाचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक असलेले व नुकतीच विश्वस्त म्हणून निवड झालेले जी एस महानगर बँकेचे संचालक बबनराव लंके यांची निवड करण्याची सभासदांनी केलेली मागणी योग्य असून त्यांचीच निवड करण्याची मागणी श्री मळगंगा यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव लंके यांनी केली आहे .
निघोजच्या सामाजिक , धार्मिक , दुग्ध व्यवसाय , सहकार क्षेत्रात नेहमीच अग्रभागी असणारा कन्हैय्या उदयोग समूहाचा लंके परिवार , याच लंके परिवारातील मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष दिवंगत शांताराम मामा लंके व जी एस महानगर बँकेचे संचालक बबनराव मामा लंके या बंधूंचे निघोज परिसरासाठी मोठे योगदान आहे.मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष स्वर्गीय शांताराम मामा लंके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर विश्वस्त म्हणुन बबनराव लंके यांची निवड करण्यात आली.
निघोजचा मळगंगा देवीचा यात्रा उत्सव वा कोणतेही सामाजिक व धार्मिक काम असो , यामध्ये शांताराम मामा लंके व बबन मामा लंके हे लंके बंधु कायम आघाडीवर असतात . प्रसंगी वैयक्तिक योगदान देतात . निघोजमध्ये त्यांनी दिलेल्या शब्दाला एक वेगळेच वजन आहे. बबनराव लंके यांच्या निवडीमुळे नक्कीच निघोज परिसर विकास कामांना वेग येणार असल्याचे असे निघोजकरांचे मत आहे , म्हणुन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या अध्यक्षपदी बबनराव लंके यांची निवड करण्याची निघोज ग्रामस्थ व बहुसंख्य सभासदांची मागणी असल्याचे प्रतिपादन मळगंगा यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव लंके यांनी केले आहे.
लंके कुटुंबाचे निघोज च्या मळगंगा यात्रा उत्सव व प्रत्येक धार्मिक कार्यात मोठा सहभाग असतो.त्यामुळे मळगंगा यात्रा उत्सव कमिटी व सभासद , ग्रामस्थांनी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट कडे केलेल्या मागणीला प्रतिसाद मिळुन बबनराव लंके यांना श्री मळगंगा ग्रामीण ट्रस्टच्या अध्यक्षपदाची संधी मिळते का ? याकडे निघोजकरांचे लक्ष लागले आहे. ]