इतर

आजचे पंचांग व राशीभविष्य दि.०२/११/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ११ शके १९४७
दिनांक :- ०२/११/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५५,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति ०७:३२, द्वादशी २९:०८,
नक्षत्र :- पूर्वाभाद्रपदा समाप्ति १७:०४,
योग :- व्याघात समाप्ति २३:१०,
करण :- बव समाप्ति १८:२५,
चंद्र राशि :- कुंभ,(११:२७नं. मीन),
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,(१३:१५नं. तुला),
राशिप्रवेश :- शुक्र – तुला १३:१५,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथि वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०४:२९ ते ०५:५५ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:३८ ते ०३:०४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भागवत एकादशी, तुलसी विवाहारंभ, पंढरपूर यात्रा, चातुर्मास्य समाप्ति, विष्णु प्रबोधोत्सव, मन्वादि, शाक-गोपद्मव्रत समाप्ति, चातुर्मासात केलेल्या व्रताची सांगता करावी, घबाड ७:३२ नं. १७:०४ प., दग्ध ७:३२ नं. २९:०८ प., भद्रा ७:३२ प.
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ११ शके १९४७
दिनांक = ०२/११/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

वृषभ
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल.

मिथुन
नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.

कर्क
हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगती च्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह
सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.

कन्या
आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.

तूळ
योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.

वृश्चिक
लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

धनू
सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.

मकर
मन:शांति लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

कुंभ
नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन
बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button