इतर

रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या अध्यक्षपदी डॉ. गौरव सामनेरकर तर सचिवपदी सीए रेखा पटवर्धन

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या नूतन कार्यकारिणीचा शानदार पदग्रहण समारंभ संस्थेच्या गंजमाळ येथील सभागृहात गुरुवारी (दि. १०) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रोटरीचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे तसेच पुण्याच्या माजी प्रांतपाल मंजू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अनन्या सामनेरकर यांनी गणेश वंदना सादर केली. माजी अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी गतवर्षात केलेल्या उपक्रमांच्या सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला. गेल्या ८० वर्षांपासून कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकचे कार्य कौतुकास्पद आहे. ही संस्था राबवित असलेले उपक्रम पाहून मनस्वी आनंद वाटतो. रोटरीच्या संस्कारातच  माझी वाढ झालेली असून, त्यामुळेच आपण या पदापर्यंत पोहोचलो. कोणावर सत्ता न गाजविता  आपण  सेवाभाववृत्तीने एकजुटीने काम केले पाहिजे, असे प्रांतपाल  ज्ञानेश्वर शेवाळे यांनी सांगितले.

सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या नाशिक रोटरीचे काम वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच ह्या क्लबमध्ये सामावून घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढताना दिसतेय असे पुण्याच्या माजी प्रांतपाल मंजू फडके यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांच्याकडून नूतन अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. तसेच सीए रेखा पटवर्धन यांनी सचिव तर आर्किटेक मकरंद चिंधडे यांनी सहसचिव पदाचा पदभार स्वीकारला. नवीन कार्यकारिणी  सदस्यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचेही स्वागत करण्यात आले.
यावेळी मावळते अध्यक्ष ओमप्रकाश रावत, सचिव शिल्पा पारख, हेमराज राजपूत, अनिल सुकेणकर, मंगेश अपशंकर, स्मिता अपशंकर, डॉ. श्रिया कुलकर्णी, निलेश सोनजे, विजय दिनानी, शशिकांत पारख  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सोनाली चिंधडे यांनी केले तर सीए रेखा पटवर्धन यांनी आभार  मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथ लीडर भरत बिरारी, रोहित देशपांडे, लीना भाकरे, सोनल कोटकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button