आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०७/०८/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १६ शके १९४७
दिनांक :- ०७/०८/२०२५,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५९,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १४:२८,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति १४:०१,
योग :- विष्कंभ समाप्ति ०६:४२, प्रीति २९:३९,
करण :- गरज समाप्ति २६:२५,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:११ ते ०३:४७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१० ते ०७:४६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३५ ते ०२:११ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:११ ते ०३:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:२३ ते ०६:५९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड १४:०१ नं., १४:२८ प., चतुर्दशी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १६ शके १९४७
दिनांक = ०७/०८/२०२५
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
राजकीय भूमिकेला यश येईल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अति घाई चांगली नाही.
वृषभ
सामाजिक भान राखावे लागेल. तरुण वर्गाला आशादायक संधी मिळतील. मित्रांच्या सहवासात रमून जाल. भावंडांचे अधिक प्रेम मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन
मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील. प्रत्येक गोष्टीत गोडी वाटेल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो.
कर्क
मानसिक चंचलता जाणवेल. बोलताना भान राखावे. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.
सिंह
मनोवांच्छित लाभेल. नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. मित्रांची उत्तम साथ लाभेल.
कन्या
तरुण वर्गाचे विचार जाणून घ्याल. काही नवीन ओळखी होतील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवू शकते.
तूळ
नवीन कामात गढून जाल. अधिकारी लोकांशी भेटता येईल. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल. पत्नीचा वरचष्मा राहील.
वृश्चिक
उगाच टोकाची भूमिका घेऊ नका. वाढीव मेहनत करावी लागू शकते. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात.
धनू
अचानक धनलाभ संभवतो. काही कामे कमी कष्टात पार पडतील. कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढेल. पित्त विकार वाढू शकतात.
मकर
प्रशंसेचा दिवस. भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखकारक राहील. कामात सुलभता येईल. शेजार्यांचा त्रास होण्याची शक्यता.
कुंभ
मौजमजा कराल. स्वत:ला नियमात बांधू नका. जोडीदाराची प्रगती होईल. नवीन कामात उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील.
मीन
सुसंवादातून लाभ होतील. घरातील कामात मन गुंतवाल. विरोधक शांत राहतील. महत्वाकांक्षी योजना आमलात आणाव्यात. परिश्रमाची कास सोडू नये.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



