इतर

श्री बाळेश्वर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा

संगमनेर-श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयात ७९ स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री अशोक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर देशभक्तीपर गाण्यांवर कवायत घेण्यात आली.


या राष्ट्रीय कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक करताना चेतन सरोदे यांनी संगितले की आज 15 ऑगस्ट आज आपण भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात थाटामाटात साजरा करत आहोत. संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. भारतीय नागरिक विविध देशभक्तीपर कार्यक्रम सामाजिक उपक्रम साजरे करत आहेत.

आपण संगणक ,औषध निर्माता ,आणि शास्त्रज्ञ, शैक्षणिक, सामाजिक इत्यादी सर्व क्षेत्रात भारत प्रगतीपथावर जात आहे. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.

आपल्या भारत देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही तर स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, देशभक्तांनी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचेच मोठी जबाबदारी आहे विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून जागतिक पटलावर देशाचे नाव लौकिक होण्यासाठी खूप मेहनत जिद्द चिकाटी देशप्रेम ठेवावे असे यावेळी सांगितले


याप्रसंगी मधुकर बांबळे, सुरेश देशमुख ,भाऊराव धोंगडे ,विकास सोनवणे ,विश्वास पोखरकर, संजय ठोकळ ,रघुनाथ मेंगाळ ,गंगाधर पोखरकर, संतोष भांगरे ,श्रीकृष्ण वर्पे, नारायण डोंगरे, विठ्ठल फटांगरे, परीक्षित चव्हाण, मंगेश औटी ,लक्ष्मण मेढे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button