कृषी

राज्यात प्लास्टिक फूल विक्रीवर तातडीने बंदी आणा- कृषीभूषण सयाजीराव पोखरकर

अकोले प्रतिनिधी

नैसर्गिक फुलां ऐवजी चीन मधून आयात होणाऱ्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे राज्यात प्लास्टिक फूल विक्रीवर तातडीने बंदी आणावी अशी मागणी कोतुळ (तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर ) येथील कृषीभूषण सयाजीराव पोखरकर यांनी केली आहे

महाराष्ट्र राज्यात सध्या गणेशोत्सव महत्वाचा आणि पवित्र सण ऊद्या पासून सुरू होत आहे.घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा साठी आरास व मखर तयार करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर केला जातो. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी शेतात पिकविल्या नैसर्गिक फुलांऐवजी चीन मधून आयात केलेल्या फुलांचा वापर राज्यभर करण्यात येतो.हा वापर शेतकऱ्यांच्या आर्थिक ऊत्पन्नावर विपरीत परिणाम करणारा तर आहेच,परन्तु पर्यावरणालाही हानीकारक आहे अगोदरच शेतमालाला शाश्वत भाव नसल्याने पिचलेला शेतकऱी मेटाकुटीला आलेला आहे.
प्लास्टिक फूलविक्रीला राज्यात बंदी घातल्याने नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील. आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
मागील महिन्यांत विधीमंडळात या विषयावर सविस्तर चर्चा होवून निर्णय झालेला आहे.मात्र, अद्याप शासनाकडून जी.आर. निघालेला नाही.याबाबत शासनाने तातडीने शासन निर्णय निगर्मीत करावा अशी मागणी कृषीभूषण सयाजीराव पोखरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांचे कडे केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button