आजचे पंचांग व राशी भविष्य दि ०७/०९/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
खग्रास चंद्रग्रहण
रविवार दि:- ७ सप्टेंबर २०२५ रोजी
खग्रास चंद्र हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे.
ग्रहण स्पर्श:- रात्री ०९:५७
ग्रहण मध्य :- रात्री ११:४२
ग्रहण मोक्ष:- उ. रात्री ०१:२७
ग्रहण कालावधी :- ३ तास ३० मिनिटे
ग्रहण वेध:- रविवार दि.७ रोजी दुपारी १२.३७ पासून
ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान,
देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मकरता
येतील. परंतु वेधकाळात भोजन वर्ज्य करावे.
आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी. दि :- ७ रोजी सायं. ०५:१५ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत.
पुण्यकाल/पर्वकाल:- ग्रहण स्पर्शापासून मोक्ष
वेळेपर्यंत.
राशीपरत्वे ग्रहण फल:-
शुभ फल :- मेष, वृषभ, कन्या, धनू
मिश्र फल:- मिथुन, सिंह, तूळ, मकर
अनिष्ट फल:- कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन.
संदर्भ:- दाते पंचांग.
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १६ शके १९४७
दिनांक :- ०७/०९/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३७,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति २३:३९,
नक्षत्र :- शततारका समाप्ति २१:४१,
योग :- सुकर्मा समाप्ति ०९:२४,
करण :- विष्टि समाप्ति १२:४४,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- ग्रहणदिन वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:०५ ते ०६:३७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५४ ते १२:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:५९ ते ०३:३२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
खग्रास चंद्रग्रहण, प्रोष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ति, संन्यासिनां चातुर्मास्य समाप्ति, कुलधर्म, अन्वाधान, भद्रा १२:४४ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १६ शके १९४७
दिनांक = ०७/०९/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. मुलांबद्दल चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात काही बदल घडून येतील. आत्मसन्मान बाळगून वागा.
वृषभ
बोलण्यात माधुर्य ठेवा. घरातील कामांना वेग येईल. व्यावसायिक गैरसमज टाळा. सामाजिक भान राखून वागावे. मानसिक शांतता लाभेल.
मिथुन
आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. हरवलेली वस्तु सापडेल. जोडीदाराच्या कलेचे कौतुक कराल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. भगवंताचे नामस्मरण करावे.
कर्क
उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. मानसिक गोंधळ टाळावा. जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. समस्येतून प्रयत्नाने मार्ग काढावा. निराश होऊ नका.
सिंह
गोष्टी मनासारख्या घडतील. मुलांशी सुसंवाद साधता येईल. गोड बोलून कार्यभाग साधावा. वाणीत माधुर्य ठेवावे. समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल.
कन्या
उगाच नसत्या भानगडीत स्वत:ला गुंतवू नका. प्रेमातील गोष्टी लांबणीवर पडू शकतात. नोकरीत प्रशंसा होईल. मन विचलीत होऊ देऊ नका. वडीलधार्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.
तूळ
घरातील जुन्या कामात अडकून राहाल. अटीतटिचे वाद वाढवू नका. वाचनात वेळ घालवावा. प्रलंबित कामात मित्रांची मदत घ्याल. बचतीच्या योजना आखाल.
वृश्चिक
घरातील जुन्या वस्तूंचा शोध घ्याल. व्यावसायिक कामात बदल जाणवेल. अभ्यासाचा कंटाळा करू नका. कामकाजात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे.
धनू
धार्मिक गोष्टींच्या सानिध्यात राहाल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ मिळेल. धनवृद्धीचे संकेत मिळतील. स्वत:च्या हिंमतीवर मार्ग काढाल. भावंडांकडून शुभ वार्ता मिळेल.
मकर
अचानक धनलाभाची शक्यता. गरम वस्तूंपासून दूर राहावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. निष्काळजीपणा नुकसान करू शकतो. भागीदारीत सतर्क राहावे.
कुंभ
जुन्या गोष्टी मार्गी लागतील. ग्रहयोग वृद्धीकारक ठरेल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.
मीन
घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्नांची कास सोडू नका. व्यापारी वर्गासाठी सामान्य दिवस.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



